नोएडा : नोएडा इथली ट्विन टॉवर इमारत पाडण्यात येणार आहे. ही देशातील दुसरी मोठा घटना आहे. मात्र ट्वीन टॉवर काही पहिल्यांदा कोसळणार आहे असं नाही. याआधी जगभरात यापेक्षाही उंच इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या गगचुंबी इमारती एकेकाळी शान होत्या. मात्र काही कारणांमुळे त्यांना पाडावं लागलं. आज ट्विन टॉवरव्यतिरिक्त अशा कुठल्या इमारती होत्या ज्या पाडण्यात आल्या त्याबद्दल जाणून घेऊया.
ओशियन टॉवर हा एकेकाळी अमेरिकेची शान म्हणून ओळखला जायचा. मात्र दोन वर्षात त्याच्या पीलरला भेगा गेल्याचं समजलं. ज्यामुळे ही भलीमोठी गगनचुंबी इमारत एका बाजूला झुकली गेली. ही इमारत नीट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र तो अपयशी ठरला. ही इमारत जवळपास १४३ मीटरहून अधिक उंच होती. २००९ मध्ये ही इमारत पाडण्यात आली. हा टॉवर पाडण्याआधी १६ इंच खोल खोदण्यात आला.
Countdown सुरू! ट्विन टॉवर्सचा ग्राऊंड रिपोर्ट, पाहा व्हिडीओ
लॅण्डमार्क टॉवर हा अमेरिकेतील आणखी एक मोठा टॉवर होता. १९५७ मध्ये हा टॉवर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाला. या इमारतीच्या वरच्या बाजूला मोठं घड्याळही होतं. ३० वर्षांनंतर या इमारतीला जमीनदोस्त करण्यात आलं. २००६ मध्ये ही इमारत पाडण्यात आली.
AFE टॉवर हा जर्मनीमधील उंच टॉवर होता. याची साधारण उंची ११६ मीटर असल्याचं सांगण्यात येत आहे. ही गोल्फ युनिव्हर्सिटीचा भाग असल्याचं सांगितलं जात होतं. हा टॉवर जमीनदोस्त करण्याची पद्धत पाहण्यासाठी साधारण ३० हजारहून अधिक लोक पाहात होते.
ट्विन टॉवर्स कोसळल्याने परिसर भूकंपासारखा हादरणार? लोकांना किती धोका? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
चीन- गोल्डन फ्लावर -११८ मीटर सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीमध्ये फार वापरलीही जात नव्हती. टॉवरला भेगा पडल्या होत्या त्यामुळे २०१५ मध्ये ही इमारत १२७० ग्रॅम विस्फोटक १२ डीटोनेटर वापरून ही इमारत पाडण्यात आली. ही इमारत १९९६ मध्ये बांधण्यात आली होती. या टॉवरची डागडुजी करणं जास्त खर्चिक असल्याने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
जे एल हडसन डिपार्टमेंट स्टोअर हा टॉवर अमेरिकेतील मिशिगन इथे होता. त्याची उंची जवळपास १३४ मीटर होती. ८० वर्षांनंतर ही इमारत १९९८ रोजी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही इमारत त्यावेळी पाडणं हे मोठं चॅलेंज होतं. २० हजार लोक या क्षणाचे साक्षीदार होते.
ब्रियान्ट पावर पॉईंट स्टेशन- १९६० रोजी ही इमारत बांधण्यात आली होती. यामध्ये कोळशापासून वीजनिर्मिती केली जात होती. हे पावरस्टेशन डिमॉलिश करण्याचं आव्हान त्यावेळी मोठं होतं. हा प्लान्ट बंद झाल्यानंतर इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ मध्ये दोन कुलिंग प्लान्ट जमीनदोस्त करण्यात आले. आधी २००६ मध्ये एक टॉवर जमीनदोस्त करण्यात आला होता. काही महिन्यांनंतर उर्वरित भागही जमीनदोस्त करण्यात आले.
तुमच्या आसपास इमारत पाडली जात असेल तर सावधान! गंभीर आजारांचा धोका, अशी घ्या काळजी
मीना प्लाझा- हा टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं, तरी देखील हा टॉवर पाडण्यात आला. ४ वेगवेगळे टॉवर्स बांधण्यात आले होते. त्याची उंची १६५ मीटर होती. २००७ मध्ये याची बांधकाम सुरू झालं. मात्र २०१२ मध्ये मालकासोबत वाद झाला. २०१४ मध्ये पुन्हा बांधकाम सुरू झालं. २०२० मध्ये सरकारने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या १० सेकंदाज ही इमारत जनीनदोस्त करण्यात आली.
पावस स्टेशन वेस्टरहोल्ट- ह्या पावरस्टेशनमधील चिमणी पाडण्यात आली होती. ही चिमणी जवळपास १६५ मीटर उंच असल्याची माहिती मिळाली आहे. मीना प्लाझासोबत ही चिमणी देखील चर्चेत आली. १९८१ मध्ये ही चिमणी बांधण्यात आली होती. ही चिमणी पाडताना एक स्फोट खाली आणि एक मधल्या भागात घडवून आणण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.