गौरव यांनी ट्वीट केलं की, "आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरात मोदी सरकारने मानलं आहे की कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराच्या सीरमचा वापर होतो. यामध्ये 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराला मारून त्याचा वापर होतो. हा गुन्हा आहे. ही माहिती सर्वांसमोर आधीच यायला हवी होती" हे वाचा - ''दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती", शास्त्रज्ञांचा खुलासा या पोस्टनंतर एकच खळबळ माजली. दरम्यान यावर मोदी सरकार आणि या लशीची निर्मिची करणाऱ्या भारत बायोटेकनंही उत्तर दिलं आहे. लस निर्मितीत व्हिरो सेल (Vero cells) तयार करण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी वासराच्या सीरमचा वापर झाला आहे. व्हायरस कल्चर करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. याआधी पोलिओ, रेबीज, इन्फ्लूएंझा लशीतही या पद्धतीचा वापर झाला आहे" "या व्हिरो सेल्सची वाढ झाल्यानंतर ते स्वच्छ केले जातात. त्यावर वासराच्या सीरमचा अंशही ठेवला जात नाही. त्यानंतर हे व्हिरो सेल्स कोरोनाव्हायरसने व्हायरल ग्रोथसाठी इन्फेक्टे केले जातात. व्हायरल ग्रोथच्या प्रक्रियेत व्हिरो सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर हा व्हायरसही निष्क्रिय आणि शुद्ध केला जातो. हा निष्क्रिय व्हायरस लशीसाठी वापरला जातो. लशीच्या शेवटच्या फॉर्म्युल्यात वासराच्या सीरमचा वापर होत नाही", अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. हे वाचा - ब्लॅक फंगसनंतर देशात ग्रीन फंगसचा शिरकाव;अधिक भयंकर लक्षणं, रुग्णाचं फुफ्फस सडलं तर भारत बायोटेकने सांगितलं, "लस निर्मिती प्रक्रियेत वासराच्या सीरमचा वापर केला जातो. हा वापर पेशींच्या विकासासाठी असतो. पण कोरोनाव्हायरसची वाढ आणि शेवटच्या फॉर्म्युल्यात याचा वापर झालेला नाही. ही लस पूर्णपणे शुद्ध आहे. त्यातील सर्व अशुद्धता हटवण्यात आली आहे. लस निर्मितीसाठी वासराच्या सीरमचा वापर कित्येक दशकांपासून जगभरात होतो आहे. गेल्या नऊ महिन्यांत याबाबत सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात आली आहे"In an RTI response, the Modi Govt has admitted that COVAXIN consists Newborn Calf Serum .....which is a portion of clotted blood obtained from less than 20 days young cow-calves, after slaughtering them.
THIS IS HEINOUS! This information should have been made public before. pic.twitter.com/sngVr0cE29 — Gaurav Pandhi (@GauravPandhi) June 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani