जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोनाल्डोच्या एका कृतीमुळे 29323 कोटींचं नुकसान, Coca Cola ने दिली पहिली प्रतिक्रिया

रोनाल्डोच्या एका कृतीमुळे 29323 कोटींचं नुकसान, Coca Cola ने दिली पहिली प्रतिक्रिया

रोनाल्डोच्या एका कृतीमुळे 29323 कोटींचं नुकसान, Coca Cola ने दिली पहिली प्रतिक्रिया

जागतिक सुपरस्टार असलेला फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मैदानाबाहेरही ज्या कृती करतो, त्याचे परिणाम होतात. युरो कपमध्ये (UEFA Euro 2020) हंगेरीविरुद्धच्या सामन्यानंतर (Portugal vs Hungary) पोर्तुगालचा कर्णधार असलेल्या रोनाल्डोने केलेल्या अशाच कृतीमुळे कोका कोला कंपनीचं (Coca Cola) कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : जागतिक सुपरस्टार असलेला फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मैदानाबाहेरही ज्या कृती करतो, त्याचे परिणाम होतात. युरो कपमध्ये (UEFA Euro 2020) हंगेरीविरुद्धच्या सामन्यानंतर (Portugal vs Hungary) पोर्तुगालचा कर्णधार असलेल्या रोनाल्डोने केलेल्या अशाच कृतीमुळे कोका कोला कंपनीचं (Coca Cola) कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. स्वत:चं आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेण्यासाठी रोनाल्डो कठोर मेहनत घेतो, त्यामुळेच वयाच्या 36 व्या वर्षीही तो एखाद्या तरुण खेळाडूप्रमाणेच फिट आहे. हंगेरीविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला, तेव्हा त्याने कॅमेरासमोर असलेल्या कोका कोलाच्या बॉटल बाजूला केल्या आणि तिकडे पाण्याच्या बॉटल ठेवल्या. कोका कोला युरो कपची स्पॉन्सर आहे, तरीही रोनाल्डोने त्याच्या कृतीतून कोला कोलाऐवजी पाणी प्या, असा संदेश दिला. रोनाल्डोच्या या एका संदेशामुळे कंपनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू 4 बिलियन युएस डॉलर म्हणजेच जवळपास 29323 कोटींनी कमी झाली आहे. कोका कोला कंपनीचे 56.10 डॉलर किंमतीचे शेअर 55.22 डॉलर झाले आहेत, म्हणजेच रोनाल्डोच्या या कृतीमुळे कंपनीच्या शेअरची किंमत 1.6 टक्क्यांनी पडली आहे. यामुळे कोका कोलाची ब्रॅण्ड व्हॅल्यू 242 बिलियन डॉलरवरून 238 बिलियन डॉलर झाली आहे. रोनाल्डोच्या या कृतीवर आता कोका कोला कंपनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपल्याला काय प्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, कारण लोकांच्या आवडी आणि गरजा वेगळ्या असतात, असं कोका कोला कंपनीने सांगितलं आहे. युरो कप स्पर्धेच्या प्रवक्त्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडू पत्रकार परिषदेसाठी येतात तेव्हा त्यांच्यासाठी कोका कोला, कोका कोला झिरो श्युगर सोबतच पाणीही ठेवलेलं असतं, असं स्पर्धेचे प्रवक्ते म्हणाले.

जाहिरात

क्रिस्टियानो रोनाल्डो हा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. सोशल मीडियावरही त्याचे कोट्यवधी चाहते आहेत, तसंच इन्स्टाग्रामवर त्याचे 300 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोने कोका कोलाच्या बॉटल बाजूला ठेवल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, तसंच जगाच्या काना कोपऱ्यातून हा व्हिडिओ शेयर करण्यात आला, ज्याचा फटका कंपनीच्या शेअरला बसला. मंगळवारी झालेल्या सामन्यात रोनाल्डोने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. पोर्तुगालने या सामन्यात हंगेरीचा 3-0 ने पराभव केला. पाचवा यूरो कप खेळणाऱ्या रोनाल्डोने मॅचच्या 87 व्या आणि 90व्या मिनिटांना दोन गोल करत त्याच्या टीमला 3-0 असा विजय मिळवून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Euro 2021
  • First Published :
जाहिरात
जाहिरात