कन्नूर : धावत्या ट्रेनमध्ये अचानक आग लागली आणि एकच गोंधळ उडाला. हा प्रकार एवढा भयंकर होता की काही कळण्याच्या आतच आगीनं रौद्र रुप धारण केलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ News18 च्या हाती आला आहे. या घटनेत ट्रेनचा एक कोच जळून खाक झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दल आणि जवानांना यश आलं मात्र ट्रेन चं खूप मोठं नुकसान झालं आहे. गेल्या दोन महिन्यात ही दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे आणखी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार एक व्यक्तीवर संशय आहे. जो कॅन घेऊन ट्रेनमध्ये चढला. ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या त्याचा तपास सुरू आहे.
Fire Breaks Out In A Train Coach in Kannur Railway Station, No Causalities reported #trainfire pic.twitter.com/97nmJIobW1
— News18 (@CNNnews18) June 1, 2023
कन्नूर-अलाप्पुझा एक्जीक्यूटिव एक्सप्रेस (16306) या ट्रेनला गुरुवारी दुपारी 1:25 मिनिटांनी अचानक आग लागली. स्टेशन मास्टर आणि ड्युटीवर असलेले अधिकारी यांच्यात गोंधळ उडाला. दुपारची वेळ असल्याने आग अधिक वेगानं पसरली. २.२० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
Train wheel: ट्रेनची चाकं बदलताना येतात नाकी नऊ! बदलण्याची प्रोसेस पाहून तुम्हीही व्हाल चकीतआग पसरत असतानाच अधिकाऱ्यांनी ज्या कोचला आग लागली तो कोच इतर डब्यांपासून वेगळा केला. ज्यामुळे ही आग इतर डब्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. कन्नूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागली, त्यानंतर ही ट्रेन कन्नूर रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आली, असे दक्षिण रेल्वेने सांगितले. आगीमुळे ट्रेनची एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
त्याचवेळी, एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती घटनेपूर्वी डबा घेऊन ट्रेनमध्ये शिरताना दिसत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप सीसीटीव्ही फुटेजला दुजोरा दिलेला नाही.
Railway Facts: ट्रेन चालवायलाही ड्रायव्हिंग लायसन्स लागतं? लोको पायलट कसं बनता?महाराष्ट्रातील रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून याच ट्रेनमध्ये शाहरुख सैफी नावाच्या व्यक्तीने एका सहप्रवाशाला पेटवून दिल्याच्या दोन महिन्यांनंतर अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसला आग लागल्याची ताजी घटना ताजी असताना पुन्हा एकदा हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.