रेल्वे वेळोवेळी ट्रेनचे मेंटेनेंस करते. यादरम्यान डब्यातील खराब झालेला भाग दुरुस्त केला जातो. ज्यामध्ये सीट ते सस्पेन्शन आणि व्हील बदलले जातात.
ट्रेनमधील मेंटेनेंस संबंधित प्रत्येक कामासाठी कोच यार्ड तयार केले जातात. जिथे रेल्वेची साफसफाई आणि आवश्यक दुरुस्ती केली जाते. मात्र चाक बदलण्यासाठी गाडी डेपोत नेली जाते.
ट्रेनची चाके दोन प्रकारे बदलली जातात. पहिले अनकपलिंग करुन आणि दुसरे बोगी ड्रॉप टेबलच्या साहाय्याने व्हील चेंज केले जातात. दोन्ही प्रक्रियांना वेळ लागतो.
बोगी ड्रॉप टेबलद्वारे ट्रेनचे चाक बदलण्यासाठी प्रथम डब्याभोवती जॅक लावला जातो. त्यानंतर ट्रेनचे मॅकेनिकल पार्ट्स उघडले जातात आणि ड्रॉप टेबलच्या मदतीने बोगी खाली आणली जाते.
ड्रॉप टेबलच्या सहाय्याने कोचचा खालचा भाग वेगळा केल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने खालचा भाग वर केला जातो आणि चाकांच्या ब्रेक पार्टला काढलं जातं.
बोगीपासून चाक वेगळे केल्यानंतर, चाकाला जोडलेले रिंग आणि इतर भाग काढून टाकले जातात. त्यानंतर सर्व पार्ट्स ट्रेनमध्ये बसवल्या जाणार्या नवीन चाकात बसवले जातात आणि नंतर ते बोगीत फिट केले जातात.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर, ड्रॉप टेबलच्या मदतीने खालचा भाग पुन्हा कोचमध्ये बसवला जातो आणि सर्व मॅकेनिकल पार्ट्स पुन्हा एकत्र केले जातात.
ट्रेनचे चाक बदलण्यासाठी, या संपूर्ण प्रक्रियेत एक मोठी टीम काम करते, ज्यामध्ये 20 हून अधिक मेकॅनिक आणि इतर कर्मचारी असतात.