मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाभयंकर Coronavirus चा नाश कधी होणार? शास्त्रज्ञांनी दिलं असं उत्तर

महाभयंकर Coronavirus चा नाश कधी होणार? शास्त्रज्ञांनी दिलं असं उत्तर

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

Coronavirus भरपूर कालावधीसाठी राहू शकतो, त्यामुळे 2022 पर्यंत social distancing ठेवण्याची गरज असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

वॉशिंग्टन, 16 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसने (Coronavirus) कहर माजवला आहे. या व्हायरसने लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे, तर हजारोंचा बळी घेतला आहे. अनेक जण व्हायरसमुळे लॉकडाऊनमुळे (Lockdown) घरात कैद झालेत. त्यामुळे या व्हायरसचा नाश कधी होणार? त्याच्यापासून सुटका कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे.

हार्वर्डच्या (Harvard) शास्त्रज्ञांनी याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी केलेला अभ्यास सायन्स जर्नलमध्ये (Journal science) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितलं, कोरोनाव्हायरस जा भरपूर कालावधीसाठी राहिल. COVID-19 मोसमी आजार होईल. जसं थंडीत लोकांना व्हायरल आजार होतात तसाच हा आजारही होईल. 2002-03 सालच्या सार्स (SAARS) आजाराप्रमाणे एका लहरीसारखा कोरोनाव्हायरसचा नाश होईल याची शक्यता शास्त्रज्ञांनी नाकारली आहे.

'आधी लढा कोरोनाशी' असं म्हणत या पोलिसांनी काय निर्णय घेतला पाहून तुम्ही कराल सलाम

त्यामुळे एकावेळी हा व्हायरस भरपूर कालावधीसाठी राहिल. त्यामुळे एका वेळीच लॉकडाऊन पुरेसं नाही. सोशल डिस्टेसिंग 2022 पर्यंत कायम ठेवायला हवं, असं म्हटलं आहे. अमेरिकेतील कोरोनाव्हायरसची परिस्थिती लक्षात घेत शास्त्रज्ञांनी असा सल्ला दिला आहे.

प्रमुख अभ्यासक स्टिफन किस्लर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, "सध्या कोरोनाव्हायरसवर कोणताही उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे सोशालिस्ट डिस्टेसिंग हा व्हायरसपासून बचाव करण्याचा मार्ग आहे. एकाच वेळी जास्त लोकं एकत्र आल्याने व्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे."

CoronaVirus नेमका आहे तरी कसा? 5 महिन्यात उलगडलेली विषाणूची रहस्यं

उपचार आणि लस उपलब्ध झाल्यानंतर लॉकडाऊनचा कालवधी आणि कठोर नियम शिथील करता येऊ शकतात. मात्र जोपर्यंत सोशल डिस्टेसिंग रुग्णालयांना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वेळ देत नाही, तोपर्यंत असं होणार नाही, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं. अद्याप या व्हायरसची बहुतेक रहस्य समोर आलेली नाहीत. हा व्हायरस एकदा होऊन गेल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीरात हा व्हायरस किती दिवस असतो हे समजलेलं नाही. तरी या व्हायरसविरोधात पुरेशा प्रमाणात आणि जास्त काळासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल, याची जास्त शक्यता नाही. असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना दिला पोटावर झोपण्याचा सल्ला आणि...

जगभरात आतापर्यंत कोरोनाव्हायरसचे 2,004,991 रुग्ण आहेत. तर 126,830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात या व्हायरसचे 11439 रुग्ण आहेत, तर 377 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Corona