नवी दिल्ली, 14 जुलै : देशाची राजधानी नवी दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रघुबीर नगर भागात एका व्यक्तीती तीन अल्पवयीन मुलांनी चाकू भोसकून हत्या केली. या हत्येच्या आरोपाखाली सोमवारी तिन्ही अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. या मुलांना सध्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ात या हत्येचा थरार रेकॉर्ड झाला. मनीष असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. असे सांगितले जाते की, 8 जुलै रोजी रघुबीर नगर येथे राहणाऱ्या मनीषची तीन अल्पवयीन मुलांनी हत्या केली होती. या दरम्यान मनीष आपला जीव वाचवण्यासाठी मदत मागत राहिला, मात्र त्याच्या मदतीला कोणीच आले नाही. यात मनीषचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह बराच काळ रस्त्यावर पडला होता. पोलिसांनाही याबाबत माहिती दिली नव्हती, रात्री उशीरा गस्त घालणाऱ्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. वाचा- धक्कादायक! तब्बल 5 दिवसांनी सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, तलावात झाली होती बेपत्ता
वाचा- घरातून रागाने बाहेर पडलेला संतोष परतलाच नाही, धरणाजवळ बाइक आढळली आणि… आता खुनाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तिन्ही आरोपी अल्पवयीन मुलांना पकडले आहे आणि बाल सुधारगृहात पाठविले आहे. मृत मनीष आणि आरोपी तीन मुले शेजारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषचा एका अल्पवयीन मुलाशी स्टंटवरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना बोलावून मनीषशी भांडण केले आणि त्याचा खून केला. वाचा- धक्कादायक: सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातल्या चार जणांची आत्महत्या