कॅलिफोर्निया, 14 जुलै : हॉलिवूड अभिनेत्री आणि Glee Star नाया रिव्हेरा (Naya Rivera) हिचा मृतदेह सोमवारी कॅलिफोर्नियातीतल तलावाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. वेंच्यूरा कंट्री पोलिसांनी (Ventura Country Sheriff) अशी माहिती दिली की, तपास पथकाला सोमवारी पिरू तलावामध्ये आढळून आलेला मृतदेह 33 वर्षीय अभिनेत्री नाया रिव्हेरा हिचा आहे. तब्बल 5 दिवसांनी पिरू लेकमध्ये गायब झालेल्या नायाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना सोमवारी यश आले. 8 जुलै रोजी तिच्या 4 वर्षाच्या मुलगा एकटाच त्यांनी भाड्याने घेतलेल्या बोटीमध्ये सापडला होता. पिरू लेकमध्ये फिरण्यासाठी नाया आणि तिचा मुलगा जोसी गेले असताना हि घटना घडली. पोलिसांना संशय होता की नाया तलावामध्ये वाहून गेली असणार, त्यामुळे त्यांनी त्यांचे शोधकार्य तलावाच्या आसपासच सुरू ठेवले होते. वेंच्यूरा कंट्री पोलिसांनी याबाबत काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. (हे वाचा- सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह, घरातील सदस्यांचे हे आहेत रिपोर्ट )
वेंच्यूरा येथील कोरोनर कार्यालयापासून तिचा मृतदेह 64 किलोमीटर दूर सापडला. पोलीस अधिकारी Eric Buschow यांनी अशी माहिती दिली आहे की, यासंदर्भात नायाच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. लॉस एंजलिसपासून तासाभराच्या अंतरावर हा तलाव आहे. रोबोटिक डिव्हाइसच्या मदतीने गेल्या 5 दिवसांपासून याठिकाणी काही डायव्हर्स नायाचा शोध घेत होते. त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यामातून देखील नायाचा शोध सुरू होता. (हे वाचा- महानायकासाठी महामृत्युंजय यज्ञ; कोरोनामुक्त होईपर्यंत चाहता यज्ञात आहुती देणार ) नाया तिच्या 4 वर्षाच्या मुलाबरोबर तलावामध्ये फिरण्यासाठी जाण्याआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आले होते. अभिनेत्री तलावाकाठी तिचा मुलगा Josey बरोबर गाडीतून उतरताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार वेन्चूरा कंट्री (Ventura County) पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
ही अभिनेत्री तिच्या 4 वर्षांच्या मुलाबरोबर तलालावर फिरण्यासाठी गेली होती. त्याकरता तिने भाड्याने एक बोट देखील घेतली होती. त्यानंतर अभिनेत्री तलावामध्ये कुठेतरी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणामुळे सर्वजण हैराण आहेत. त्याचप्रमाणे तिचा 4 वर्षांचा मुलगा पोलिसांंना त्यांनी घेतलेल्या बोटीमध्ये एकटाच सापडला होता. नायाने बेपत्ता होण्याआधी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाबरोबर एक फोटो देखील पोस्ट केला होता. फॉक्स म्यूझिकल कॉमेडी ग्ली मध्ये नायाने Santana Lopez या चिअरलीडरची भूमिका केली होती. यातील सहाही सीझनमध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. या सीरिजमध्ये ती तिसरी अशी कलाकार आहे जिच्या अवघ्या तिशीमध्येच मृत्यू झाला आहे.