जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक: सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातल्या चार जणांची आत्महत्या

धक्कादायक: सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातल्या चार जणांची आत्महत्या

जगात एकूण होणाऱ्या मृत्यूंमध्ये आत्महत्यांचं प्रमाण 1.4% आहे. त्याचबरोबर ग्रीनलँड, दक्षिण कोरिया आणि कतारमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर अभ्यानुसार, भारतातही आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

जगात एकूण होणाऱ्या मृत्यूंमध्ये आत्महत्यांचं प्रमाण 1.4% आहे. त्याचबरोबर ग्रीनलँड, दक्षिण कोरिया आणि कतारमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर अभ्यानुसार, भारतातही आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

गेल्या चार महिन्यांपासून असलेला बंद, रोजगाराचा अभाव, त्यामुळे सावकाराचं घेतलेलं कर्ज फेडतांना या कुटुंबाची ओढाताण होत होती. त्यातच सावकाराचा कर्ज फेडण्यासाठी सारखा तगादा असल्याने ते कुटुंब त्रासून गेलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर 13 जुलै: शहरात कोरोनाचा उद्रेक असतानाच आज एका घटनेनं खळबळ उडाली. एकाच कुटुंबातल्या चार जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पती, पत्नी मुलगा आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या चार महिन्यांपासून असलेला बंद, रोजगाराचा अभाव, त्यामुळे सावकाराचं घेतलेलं कर्ज फेडतांना या कुटुंबाची ओढाताण होत होती. त्यातच सावकाराचा कर्ज फेडण्यासाठी सारखा तगादा असल्याने ते कुटुंब त्रासून गेलं होतं. त्यामुळे भविष्यात आपलं काय होईल या विवंचनेत असतानाच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकाच दिवशी सर्वच कुटुंब संपल्याने परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या आत्महत्येमागे इतर काही गोष्टी कारणीभूत आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने या कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेत आणखी भर पडली होती. परिस्थिती लवकर पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या निराशेत भर पडली होती. सोलापुरातील हांडे प्लॉटमधली ही घटना आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि उपायुक्त बापू बांगर घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात