मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रेरक कथा : कधीकाळी ही भारतीय महिला होती टॅक्सी ट्रायव्हर, आता न्युझीलॅंडच्या पोलिसदलात आहे अधिकारी

प्रेरक कथा : कधीकाळी ही भारतीय महिला होती टॅक्सी ट्रायव्हर, आता न्युझीलॅंडच्या पोलिसदलात आहे अधिकारी

उमेद ठेवत संघर्ष केला तर काय होऊ शकतं हे या मनदीपची कथा आपल्याला सांगते.

उमेद ठेवत संघर्ष केला तर काय होऊ शकतं हे या मनदीपची कथा आपल्याला सांगते.

उमेद ठेवत संघर्ष केला तर काय होऊ शकतं हे या मनदीपची कथा आपल्याला सांगते.

  • Published by:  News18 Desk

चंदिगढ, 22 मार्च : म्हणतात ना,जे लोक मनापासून कष्ट करतात त्यांना कधीच अपयश येत नाही. त्यांना हवा तो मुक्काम नक्कीच गाठता येतो. पंजाबच्या एका महिलेनं आपली स्वप्नं साकार करत जगाला हेच दाखवून दिलं आहे. (New Zealand news)

काहीच अशक्य नसतं हाच संदेश तिनं जगाला दिला आहे. या महिलेचं नाव आहे मनदीप कौर सिद्धू. ती न्यूझीलँड पोलिसात भर्ती होणारी ती पहिली महिला आहे. मनदीप मूळच्या पंजाबजवळील मनसा गावच्या जवळ असणाऱ्या कमालू इथली आहे. इथून ती आधी चंदिगढला शिफ्ट झाली. यानंतर तिचं लग्न झालं. मुलं झाली.  (woman was taxi driver in new Zealand now police officer)

हळूहळू कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. 1996 मध्ये मनदीप ऑस्ट्रेलियाला गेली. तिथं मनदीपनं शिक्षण घेतलं. काही वर्षांनी ती न्युझीलँडला शिफ्ट झाली. आधी त्या तिथल्या पेट्रोल पंपावर काम करायच्या. शिवाय त्या लोकांच्या घरी जात विविध वस्तूही विकायच्या. लोकांना आपली फोन सर्व्हिस बदलण्याची गोष्ट गळी उतरवण्याचं कामही मनदीपनं केलं. मात्र तिचं इंग्लिश फार काही चांगलं नव्हतं. शिक्षण मात्र तिनं सोडलं नाही. तिच्यात चिकाटी होती. (mandeep siddhu success story)

हेही वाचा घरकामगार महिला लढवणार आमदारकीची निवडणूक; धुणी-भांडी केल्यानंतर करते प्रचार

टॅक्सी चालवण्याची सुरवात

ती 1999 साली न्युझीलँडला गेली. इथं ती YMCA Women lodge मध्ये राहायची. हा लॉज ऑकलँडमध्ये होता. इथं रात्रीच्या वेळी एक जो नावाची व्यक्ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. त्यांचं पूर्ण नाव होतं जॉन पेग्लर. जॉन यांना ती वडील मानत असे. ती त्यांना 'किवी फादर' म्हणते. मनदीप कामावरून थकून यायची तेव्हा जॉन तिच्याशी गप्पा मारत. तिला खायला हॉट मिलो बनवून देत. शिवाय ते तिला आपल्या पोलिसी आयुष्यातल्या कथाही ऐकवत. (mandeep siddhu struggle story)

एकदा बोलून दाखवली मनातली इच्छा

एके दिवशी 52 वर्षीय मनदीपनं जॉन यांना मनातली इच्छा बोलून दाखवली. ती म्हणाली, की तिला पोलीसदलात भर्ती व्हायचं आहे. यावर जॉन यांनी अजिबात वेळ घालवला नाही. मनदीप सांगते, की मला आठवतं, त्यांनी म्हटलं होतं की न्युझीलँड पोलिसदलात बाहेरच्या लोकांचं असणं आणि त्यांनी आपली ओळख बनवणं खूप गरजेचं आहे.

पण हे सोपं नव्हतं

मनदीपच्या कुटुंबानंही तिची मदत केली. तिच्या आई-वडिलांनाही तिचं हे नवं करियर आवडलं होतं. मनदीपनं आधी  ०किलो कमी केलं. खूप कष्ट घेतले. 2002 मध्ये तिची मुलंही न्यूझीलँडला आली. यानंतर दोन वर्षांनी मनदीप न्यूझीलँड पोलीस दलात दाखल झाली.

हेही वाचा महिलाही होऊ शकतात रेस्तराँच्या उत्तम शेफ; अनुकृती देशमुख बदलवतेय मानसिकता

पहिली भारतीय महिला

मनदीपनं पोलीस दल जॉईन केलं तेव्हा ती सिनियर कॉन्स्टेबल होत्या. नंतर तिनं प्रमोशनसाठी अर्ज केला. मात्र प्रमोशन झालं नाही. त्यांनी अनेकदा अर्ज केला. आता ती सिनियर सार्जंट आहे. ती पहिली भारतीय महिला आहे जी या पदापर्यंत पोचली आहे.

आपल्या आसपासच्या चांगल्या लोकांना ओळखा

nzherald ला दिलेल्या मुलाखतीत मनदीप सांगते, 'तुम्ही तुमच्या आसपास पहाल तर तुम्हाला नेहमीच असे लोक दिसतील जे तुमची मदत करण्यास तयार असतील. त्यांना ओळखा. स्वतःमध्ये बदल करा. या बदलांच्या माध्यमातून पुन्हा जग बदला. मनदीपनं पतीपासून घटस्फोट घेतला. संघर्ष केला. आज मुलं तिच्यासह आहेत. आज मुलं मोठी झालीत. मुलांनाही मुलं झालीत. मात्र आजही मनदीप कार्यरत आहे.

First published:

Tags: Inspiring story, New zealand, Punjab, Taxi Driver