कोलकाता, 21 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 8 व्या टप्प्यात 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत होण्याचं जाहीर केलं आहे. पक्षांच्या अनेक जागांवर उमेदवार उभे राहिले आहेत. (west bangal assembly election to be contested by domestic worker kalita mazi)
उमेदवारांनी यश मिळविण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आऊसग्राम विधानसभा जागेसाठी घरकाम करणाऱ्या कलिता माझीला भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कलिता माझी यांच्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराचं काम थोडं अवघड झालं आहे. कलिता ही डोमेस्टिक हेल्पर म्हणजेच घरकामगार आहेत. आपल्या निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी त्यांना घरातील कामं पूर्ण करावी लागतात, त्यानंतर ते प्रचार करण्यासाठी जाऊ शकतात.
आपल्या या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कलिताने आपल्या मालकांकडून एक महिन्याची सुट्टी मागितली आहे. बर्डवान जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबाशी संबंधित कलिता माझीला आउसग्राम जागेवरुन भाजपने उमेदवारी घोषित केली आहे. गुरुवारी भाजपने आउसग्राम जागेवरुन आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली, त्यानंतर कलिता माझीचं जीवन बदललं. जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने त्यांना आपला उमेदवार घोषित केलं आहे. म्हणजे जर कलिताने निवडणूक जिंकली तर ती आउसग्रामची आमदार होईल आणि विधानसभेत बसेल. कलितासाठी हे काम नक्कीचं सोपं नाही. त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी अन्य उमेदवारांहून अधिक संघर्ष करावा लागत आहे.
हे ही वाचा-तिकीट न मागताच दिली उमेदवारी, भाजपाची बंगालमध्ये डबल फजिती!
पहिल्यांदा तर कलिता दररोज लोकांच्या घरात जाऊन काम संपवते. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी जाते. आता तर त्यांनी आपल्या घरकामातून एक महिन्याची सुट्टी घेतली आहे. कलिता म्हणते की, घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ती जास्त शिक्षण घेऊ शकली नाही. जर ती निवडणूक जिंकली तर ती गरीब मुलांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करेल. माझी ही भाजपची सक्रिय सदस्य आहे आणि नुकताच त्यांनी पंचायत निवडणूक देखील लढली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.