Home /News /national /

देशातील सर्वात तरुण महापौर आणि सर्वात तरुण आमदार यांचं जुळलं सूत, लवकरच अडकणार लग्नबेडीत

देशातील सर्वात तरुण महापौर आणि सर्वात तरुण आमदार यांचं जुळलं सूत, लवकरच अडकणार लग्नबेडीत

भारतातील सर्वात तरुण महापौर (Youngest Mayor of India) असणाऱ्या आर्या राजेंद्रन (Aarya Rajendran) आणि केरळचे सर्वांत तरुण आमदार होण्याचा मान मिळवणारे (Youngest MLA of India) केएम सचिन देव (KM Sachin Deo) यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
तिरुवअनंतपुरम, 17 फेब्रुवारी: राजकारणात तरुण, उच्चशिक्षित लोक उतरत नाहीत, अशी तक्रार खूप पूर्वीपासून होत होती, मात्र आता हे चित्र बदललेलं दिसत आहे. अगदी ग्रामपंचायत स्तरापासून ते लोकसभेपर्यंत मोठ्या प्रमाणात तरुण पिढीतील उच्चशिक्षित उमेदवार स्थान निर्माण करत आहेत. नव्या जगाचे, नव्या विचारांचे वारे राजकारणालाही नवी दिशा देत आहे. यात महिलांचे अस्तित्वही जाणवू लागले आहे. नव्या संकल्पना, नवी ऊर्जा, उत्साह घेऊन काम करणारी ही मंडळी भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. राजकारणात पक्ष एकमेकांशी युती करतात. तसंच दोन युवा राजकीय नेत्यांनी खासगी आयुष्यात परस्पर युती करण्याचा निर्णय घेतल्यानं सध्या केरळमधील (Kerala) या युवा प्रतिनिधींची जोरदार चर्चा होत आहे. भारतातील सर्वात तरुण महापौर (Youngest Mayor of India) असणाऱ्या आर्या राजेंद्रन (Aarya Rajendran) आणि केरळचे सर्वांत तरुण आमदार होण्याचा मान मिळवणारे (Youngest MLA of India) केएम सचिन देव (KM Sachin Deo) यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एरवी राजकारणात टीका, आरोप प्रत्यारोप अशा बातम्या अधिक असतात, मात्र या बातमीनं राजकीय वर्तुळातही आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. हे वाचा-'आजचं प्रेम फेसबुकिया..',एकेकाळी खतरनाक डाकू असणाऱ्या 'चंबळ क्वीन' ची LOVE STORY आर्या राजेन्द्रन या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या महापौर (Thiruvananthapuram Mayor) आहेत. तर केएम सचिन देव हे बालुसेरीचे आमदार (Baluseri MLA) आहेत. दोन्ही नेते माकपशी (CPI (M)) संबंधित आहेत. आता दोघांनीही एकमेकांचे जोडीदार बनण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. दोघेही लोकप्रतिनिधी असल्यानं कोणत्याही प्रकारची अफवा किंवा चुकीची माहिती लोकांमध्ये पसरू नये, यासाठी कुटुंबासह पक्षालाही आम्ही आमच्या या निर्णयाची माहिती दिली असून, कुटुंब आणि पक्षाशी बोलून लग्नाची तारीख निश्चित केली जाईल, असं या दोघांनी सांगितलं आहे. आर्या यांनी डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आणि त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षीच त्या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनल्या आहेत. सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम आर्या यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्या निवडणुकीत माकपने 100 पैकी 52 प्रभाग जिंकले होते. त्यानंतर, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Legislative Assembly Election) केएम सचिन देव हे सर्वात तरुण आमदार बनले. ते 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. केएम सचिन देव हे एसएफआयचे (SFI) राज्य सचिव आहेत, तर आर्या पक्षाच्या बाल संगम विभागाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. हे वाचा-वडिलांचं स्टेशनरी दुकान,मुलगा बनला करोडपती! Google ने या कारणामुळे दिले 65 कोटी आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. एसएफआयमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची राजकीय विचारसरणीही सारखीच आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आर्या आणि केएम सचिन देव यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Kerala

पुढील बातम्या