Home /News /technology /

वडिलांचं स्टेशनरी दुकान तर मुलगा बनला करोडपती! Google ने या कारणामुळे दिलं 65 कोटींचं बक्षीस

वडिलांचं स्टेशनरी दुकान तर मुलगा बनला करोडपती! Google ने या कारणामुळे दिलं 65 कोटींचं बक्षीस

एका भारतीय सायबर तज्ज्ञानं अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील कमतरता शोधून काढल्या असून, त्याच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल गुगलनं (Google) त्याला 8.7 मिलियन डॉलर्स अर्थात तब्बल 65 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे.

इंदूर, 17 फेब्रुवारी: दिवसेंदिवस डिजिटल क्षेत्राची व्याप्ती आणि विकास झपाट्यानं वाढत आहे. जितक्या वेगानं डिजिटल क्षेत्रातील प्रगती होत आहे, त्याच वेगानं सायबर गुन्ह्यांचं (Cyber Crime) प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा (Cyber security) हा सध्या या क्षेत्रातील कंपन्यांचा चिंतेचा सर्वात मोठा मुद्दा आहे. ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी सायबर तज्ज्ञ सतत कार्यरत असतात. अशाच एका भारतीय सायबर तज्ज्ञानं अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील कमतरता शोधून काढल्या असून, त्याच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल गुगलनं (Google) त्याला 8.7 मिलियन डॉलर्स अर्थात तब्बल 65 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे. या संशोधकाचे नाव आहे अमन पांडे (Aman Pande) . त्यानं 2021 या वर्षात अँड्रॉइड (Bugs in Android) ऑपरेटिंग सिस्टममधील 232 उणीवा शोधून काढल्या आहेत. इंदूरमध्ये (Indoor Aman Pandey) राहणाऱ्या या तरुण सायबर संशोधकानं एनआयटी भोपाळमधून (NIT Bhopal) पदवी प्राप्त केली असून, बग्जमिरर (Bugsmirror) या कंपनीचा तो संस्थापक आहे. या कंपनीमध्ये 15 जणांचा स्टाफ आहे. अमन पांडेचे वडील स्टेशनरी दुकान चालवतात. गुगलकडून मिळालेल्या या रकमेचा वापर अमन कंपनीच्या प्रगतीसाठी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे वाचा-Instagram च्या विविध पोस्ट एकत्र करता येतील डिलीट, तुम्हाला माहितेय का हे फीचर? भारतीय बाजारपेठेत बहुतांश ग्राहक अँड्रॉइड (Android) ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत मोबाइल वापरतात. त्यामुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांचा धोका अधिक आहे. या पार्श्वभूमीवर, अमन पांडे यानं अँड्रॉइड (Android) ऑपरेटिंग सिस्टमच्या असंख्य उणीवा शोधून काढल्यानं त्यावर उपाययोजना करणं शक्य झालं असून, ही सिस्टीम सुरक्षित करणं शक्य झालं आहे. गुगलसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कंपनीनं अमन पांडे याच्या संशोधनाचं कौतुक केलं असून, सर्वोत्तम संशोधनाचे बक्षीस दिले आहे. 2021 मध्ये अँड्रॉइड (Android) ऑपरेटिंग सिस्टममधील सुमारे 333 उणीवा शोधून काढण्यात आल्या असून, त्यासाठी 115 संशोधकांना पुरस्कृत करण्यात आलं आहे. त्याकरता कंपनीनं एकूण 2.2 मिलियन डॉलर्सची बक्षिसं दिली आहेत. हे वाचा-Two-step Verification नंतर Google आणणार आणखी एक Security Feature, कसा होईल फायदा अमन पांडे याच्या बग्जमिरर या कंपनीचा मुख्य उद्देशच प्रत्येकाला सायबर सुरक्षा धोक्यांपासून संरक्षण देणं आणि स्मार्टफोन,पीडीए (PDA) किंवा कोणतंही आयओटी (IoT) डिव्हाइस मालवेअर आणि व्हायरसपासून मुक्त राहील याची खात्री करणं असा आहे. त्यामुळेच सध्या त्याचे संपूर्ण लक्ष अँड्रॉइडवर आहे.
First published:

Tags: Indore, Indore News

पुढील बातम्या