पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये तरुणींची वाईट अवस्था, अंगावर शहारे आणणारी धक्कादायक आकडेवारी

पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये तरुणींची वाईट अवस्था, अंगावर शहारे आणणारी धक्कादायक आकडेवारी

लॉकडाऊनचा फायदा घेऊन पाकिस्तानी पुरुष महिला आणि मुलांवर भयंकर गुन्हे करीत आहेत, असे पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या (PHRC) रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 13 मे : एकीकडे पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus)उपासमार व गरिबी वाढत असताना दुसरीकडे महिलांवरील गुन्ह्यांमध्येही तीव्र वाढ झाली आहे. लॉकडाऊनचा फायदा घेऊन पाकिस्तानी पुरुष महिला आणि मुलांवर भयंकर गुन्हे करीत आहेत, असे पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या (PHRC) रिपोर्टमध्ये समोर आले आहे. बलात्कार, अपहरण, घरगुती हिंसाचार आणि अनैसर्गिक लैंगिक कृत्य यांसारख्या घटनांमध्ये 200% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

पाकिस्तान मानवी हक्क आयोगाशी संबंधित स्थायी सामाजिक विकास संघटनेने(SSDO) एका अहवालात म्हटले आहे की, कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महिला आणि मुलांची परिस्थिती सर्वात वाईट आहे. महिला आणि मुलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, हे आकडेवारी इतिहासातील सर्वोच्च आहे. इस्लामाबादस्थित स्वयंसेवी संस्थेने असे म्हटले आहे की बाल शोषण, घरगुती हिंसाचार, अपहरण आणि बलात्काराचीही प्रकरणे वाढत आहेत.

धक्क्दायक आकडेवारी आली समोर

SSDOने इंग्रजी भाषेच्या तीन वृत्तपत्र द न्यूज, द डॉन आणि द नेशन तसेच तीन उर्दू वर्तमानपत्र जंग, दुनिया आणि एक्सप्रेस या तीन वृत्तपत्रांमधून 'ट्रॅकिंग क्राइम्स अगेन्स्ट इन ह्युम इन पाकिस्तान' या अहवालाचा डेटा गोळा केला आहे. गुन्हे हे आठ प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. यात बाल विवाह, बाल अत्याचार, बालमजुरी, घरगुती अत्याचार, अपंग, बलात्कार, महिलांवरील हिंसा आणि खून यांच्या समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये मुलांवर अत्याचाराच्या 13 घटना घडल्या, तर मार्चमध्ये 61 प्रकरणे नोंदवली गेली. घरगुती हिंसाचाराच्या घटना फेब्रुवारी महिन्यात सहा वरून मार्चमध्ये 20 पर्यंत वाढल्या आहेत. मार्चमध्ये बलात्काराच्या 25, फेब्रुवारीमध्ये 24 आणि जानेवारीत नऊ प्रकरणे नोंदवली गेली. अपहरण प्रकरणात लक्षणीय वाढ झाली. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अपहरण झाल्याच्या 48 आणि 41 घटना नोंदवल्या गेल्या.

संबंधित-

भाजप नेत्याची लॉकडाऊनमध्ये पोलिस आणि वाळू तस्करांसोबत रंगली ओली पार्टी!

लष्कराच्या रुग्णालयातच झाडाला लटकून कोरोना पॉझिटिव्ह जवानाची आत्महत्या

अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेले सपासप वार, महिलेने जागेवरच सोडला जीव

First published: May 13, 2020, 10:47 AM IST

ताज्या बातम्या