नवी दिल्ली, 11 मे : तिहार तुरुंगात बलात्काराच्या (Rape) प्रकरणात आलेल्या एका आरोपीला आयसोलेट करण्यात आलं आहे. याशिवाय आरोपीची कोरोना चाचणी (Covid -19) करण्यात आली आहे. आरोपीवर ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे.
या बातमीनंतर जेल प्रशासन हादरलं आहे. या आरोपीसोबत राहणाऱ्या दोन कैद्यांनाही विविध ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. हे तिघे जेल नंबर – 2 मध्ये राहत असल्याचं सांगितलं जात आहे. डीजी तिहार जेल प्रशाननाने सांगितले आहे की, तुरुंगात आलेल्या सर्व कैद्यांना 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन करण्यात येतं. जेल क्र. 2 मध्ये बिहारचे माफिया डॉन शहाबुद्दीन आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन बंद आहेत. हे कोणाच्याही संपर्कात आले नसल्याचं सांगितलं जात आहे.
तिहार तुरुंगातील परदेशी महिला कैद्यांनी मागितला पेरॉल
तिहार तुरुंगात 54 परदेशी महिला कैदी शिक्षा भोगत आहे. सध्या कोरोनाचा होत असलेल्या प्रसारामुळे त्यांनी तुरुंग प्रशासनाला निवेदन लिहिलं आहे. त्यामध्ये दिल्याप्रमाणे, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्हाला पॅरोल देण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जस्टिस हेमा कोहली यांच्या अध्यक्षतेअंतर्गत असलेल्या हाय पॉवर कमिटीकडे पाठविण्यात आलं आहे.
तिहार जेलमधील कैदी हॅन्ड सॅनिटायजर तयार करण्याचे काम करीत आहे. याचा पोलीस कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. आतापर्यंत कैद्यांनी 2000 हून अधिक सॅनिटायरझर तयार केलं आहे.
संबंधित-चांगली बातमी! 45 वर्षे खाकी वर्दीसाठी तैनात असलेल्या योद्ध्याने कोरोनाला हरवलं
'लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय घेतले म्हणून नाहीतर...', WHOनं केलं मोदी सरकारचं कौतुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Tihar jail