मराठी बातम्या /बातम्या /देश /Indian Railways: ट्रेनमधील फॅनचोरीला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेनं लढवली अनोखी शक्कल

Indian Railways: ट्रेनमधील फॅनचोरीला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेनं लढवली अनोखी शक्कल

indian railway

indian railway

चोर रेल्वेतील फॅन, वायरिंग, सीट कुशन्स काढून नेतात. अशा उपद्रवी लोकांना कंटाळून भारतीय रेल्वेनं अतिशय खास पद्धतीचे फॅन (Railway Fan) बसवलेले आहेत.

    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या (Indian Railways) कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाचं असते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. रेल्वेतून प्रवास करताना बोगींच्या आतमध्ये विविध सूचना लिहिलेल्या तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. 'रेल्वेची संपत्ती तुमचीच संपत्ती आहे. कृपया तिची काळजी घ्या', अशा कितीतरी सूचना बोगीच्या आतमध्ये ठिकठिकाणी लिहिलेल्या असतात. या सूचना का लिहिल्या गेल्या आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

    प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये असे काही अतरंगी प्रवासी असतात की, ज्यांना सार्वजनिक मालमत्तेची (Public property) अजिबात काळजी नसते. असे लोक सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड (Vandalism of public property) करण्यात आणि त्यातील वस्तू आपल्या घरी घेऊन जाण्यात धन्यता मानतात. याशिवाय काहीवेळा रेल्वेगाड्या लुटण्याच्याही घटना घडतात. तेव्हा देखील चोर रेल्वेतील फॅन, वायरिंग, सीट कुशन्स काढून नेतात. अशा उपद्रवी लोकांना कंटाळून भारतीय रेल्वेनं अतिशय खास पद्धतीचे फॅन (Railway Fan) बसवलेले आहेत. हे फॅन सहजासहजी काढता येत नाहीत. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    वाचा : डिसेंबरपासून फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रासह या राज्यांतील अनेक ट्रेन्स रद्द, इथे वाचा संपूर्ण यादी

    भारतीय रेल्वेने गाड्यांमधून होणारी फॅनची चोरी (Fan theft) थांबवण्यासाठी अनोख्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं आहे. हे फॅन जोपर्यंत रेल्वेमध्ये बसवलेले आहेत तोपर्यंतच काम करतात. त्यांची रचनाच अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते सामान्य घरांमध्ये चालूच शकत नाहीत. आपण घरांमध्ये अल्टरनेट करंट (AC) आणि डायरेक्ट करंट (DC) अशा दोन प्रकारची वीज वापरतो. जर घरामध्ये एसी वीज वापरली जात असेल तर तिची कमाल शक्ती 220 व्होल्ट इतकी असते. जर घरामध्ये डीसी वापरली जात असेल तर तिची कमाल शक्ती 5, 12 किंवा 24 व्होल्ट इतकी असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन ट्रेनमध्ये बसवल्या जाणाऱ्या फॅनची रचना करण्यात आली आहे. ट्रेनमधील फॅन हे 110 व्होल्ट्स क्षमतेच्या डायरेक्ट करंटवर चालतील, अशा पद्धतीनं त्यांना डिझाईन करण्यात आलं आहे. याचाच अर्थ ट्रेनमधील फॅन घरातील एसी किंवा डीसी प्रकारच्या वीजेवर चालतच नाहीत.

    वाचा : Indian Railways प्रवाशांसाठी Good News; प्रवासात जेवणाचं टेन्शन जाणार, ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू

    10 वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये 18 डब्यांचा रॅक लॉक न करताच सेंट्रिंगमध्ये सोडण्यात आला होता. चोरट्यांनी या गोष्टीचा फायदा घेऊन ट्रेनमधील पंखे, बल्ब, पँट्री (Pantry) कारमधील रेफ्रिजरेटर आदी साहित्य चोरून नेलं. नंतर या चोरट्यांना पकडण्यातही आलं. मात्र, या गोष्टीमुळं ट्रेनमधील फॅनची (Train Fan) रचना बदलण्याची गरज असल्याचं रेल्वे मंत्रालयाला जाणवू लागली. त्यानंतर ट्रेनमध्ये 110 व्होल्ट्स क्षमतेच्या डायरेक्ट करंटवर चालणारे फॅन बसविण्यात आले.

    सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चोरी हा कायद्यानं गुन्हा आहे. ट्रेनमध्ये चोरी म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणं. ट्रेनमधील चोरीसाठी आयपीसी कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या कलमाअंतर्गत एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास तिला 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड, अशी दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीनही मिळत नाही. त्यामुळं चुकूनही कधी ट्रेनमध्ये चोरी करण्याचा विचार करू नका.

    First published:

    Tags: Indian railway, Railway