मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे

नवी दिल्ली, 4 मार्च : चीनमध्ये (China) पसरलेल्या साथीच्या रोगाने संपूर्ण देशामध्ये रौद्र रुप धारण केलं आहे. भारतालाही याचा धोका जाणवत असून सध्या देशात (India) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या 28 वर गेली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोरोनाला रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता कोरोनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका पण खबरदारी घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

संबंधित - कोरोनाव्हायरसवर औषध सापडलं, ‘या’ कंपनीने केला दावा; विषाणूवर उपचार शक्य होणार

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीत जाणे  टाळावे. सध्या अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. इतर व्हायरस प्रमाणेच यावरही उपचार आहे. कोरोनाचा जगातील मृत्यू दर फक्त 2 टक्के आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 15 प्रयोगशाळा पूर्वी स्थापन केल्या गेल्या होत्या. यापुढे आणखी 19  प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. सध्या देशात एकूण 34 लॅब उभ्या करण्यात आल्या आहेत. इराणमधील भारतीयांसाठी तेथे एक लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना भारतात आणले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित - कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका

भारतात (India) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही (Maharashtra) कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली (New delhi), तेलंगणा (Telangana) , राजस्थान (Rajasthan) पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik) हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आता तिथल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

संबंधित - Alert ! महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका; नाशिकमध्ये संशयित रुग्ण सापडला

सर्दी झाल्यावर आणि खोकला आल्यावर रुमाल वापरणे आवश्यक असून अशा परिस्थितीत स्वच्छता आणि काळजी घ्यावी. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी चांगला आहार ठेवावा. उपचार करुन हा आजार बरा होतो. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित - Alert! भारतात पुन्हा आला महाभयंकर 'कोरोना', 2 रुग्णांना व्हायरसची लागण

First published:
top videos

    Tags: Coronavirus, India