या दोघांनाही आता वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. संबंधित - नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल भारतात कोरोनाचा सर्वात पहिला रुग्ण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सापडला होता. त्यानंतर आणखी 2 रुग्ण सापडले. हे तिघंही केरळातील होते. त्यांच्यावर उपचार झाले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली. कोरोनाव्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देतं आहे. फक्त चीनच नव्हे, तर इतर देशातही हा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. भारताने हा लढा जिंकला, आता पुन्हा कोरोना भारतासमोर आव्हान बनून उभा राहिला आहे. संबंधित - 'कोरोना'शी लढताना... भारतातील पहिल्या रुग्णाची व्हायरसवर मात, शेअर केला अनुभव आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घ्या. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही सर्व लक्षणं कोरोनाव्हायरसची आहेत. त्यामुळे सामान्य म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. शिवाय कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक असे उपाय करा. हात स्वच्छ धुवा, शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका, शिवाय प्राण्यांपासून दूरच राहा. संबंधित - कोरोनाची दहशत, चिमुरडीचा निरागसपणा; मास्क घालून बिस्कीट खाताना तिचा Video पाहा कोरोनाव्हायरसमुळे जगभरात सोमवारपर्यंत 3000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 88,000 पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे. चीनमध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला आणि आता 60 पेक्षा अधिक देशांमध्ये या व्हायरसने थैमान घातलं आहे. चीननंतर इराणमध्ये या व्हायरसने सर्वात जास्त लोकांचा जीव घेतला आहे. इराणमध्ये मृतांची संख्या 54 वर पोहोचली आहे, तर 978 रुग्ण आहे. तर चीनपाठोपाठ दक्षिण कोरियात या व्हायरसचे सर्वाधिक 4,335 रुग्ण आहेत.सीधा प्रसारण !! कोरोनावायरस पर भारत की तैयारियों को लेकर डॉ हर्ष वर्धन, केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री की प्रेस वार्ता https://t.co/7Vzn9wadhj
— DrHarshVardhanOffice (@DrHVoffice) March 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus