शिक्षणमंत्र्यांनाच येत नाही राष्ट्रगीत, काँग्रेस नेत्यानं VIDEO शेअर करून केली पोलखोल

शिक्षणमंत्र्यांनाच येत नाही राष्ट्रगीत, काँग्रेस नेत्यानं VIDEO शेअर करून केली पोलखोल

विशेष म्हणजे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हे भागलपूर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

  • Share this:

पाटणा, 18 नोव्हेंबर: बिहारमध्ये नीतीश सरकारला (Nitish Government) सत्तेवर येऊन दोन दिवस होत नाही तोच विरोधकांनी टीका करणं सुरू केलं आहे. शिक्षणमंत्रिपदी वर्णी लागलेले मेवालाल चौधरी (Mewalal Chaudhary) यांच्यावरून राष्ट्रीय जनता दलानं (RJD) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आता तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक व्हिडिओ शेअर करून थेट शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांची पोलखोल केली आहे. संजय निरुपम यांनी शिक्षणमंत्र्यांच्याच गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हेही वाचा..पत्नी विरह झाला नाही सहन, पतीनं फेसबुक Live करत रेल्वेसमोर मारली उडी

शिक्षणमंत्र्यांनाच म्हणता येत नाही राष्ट्रगीत

संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याद्वारे निरुपम यांनी दावा केला आहे की, बिहारच्या नव्या शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हे भागलपूर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

'हे आहेत बिहारचे नवे शिक्षणमंत्री. महाशय एका विद्यापीठाचे कुलगुरू होते. पण पाहा ना त्यांना तर राष्ट्रगीत देखील म्हणता येत नाही. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील त्यांच्यावर आहेत. भारतीय लोकशाहीत यांचं पाप कोण धुणार?, असा सवाल संजय निरुपण यांनी केला आहे. मात्र, व्हिडिओ दिसणारी व्यक्ती शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हेच आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, या आधी हाच व्हिडिओ बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान (Bihar Assembly Election) राष्ट्रीय जनता दलानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून आरजेडीनं नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारवर पहिला हल्लाबोल केला. मेवालाल चौधरी यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. असे आरोप असणाऱ्या मेवालाल चौधरी यांनी राज्यचं शिक्षणमंत्री बनवल्यानंतर ऐन हिवाळ्यात राजकारण तापलं आहे.

सुशील कुमार मोदींचा कट केला पत्ता..

बिहारमध्ये भाजपने दिग्गज नेते सुशील कुमार मोदी यांचा पत्ता कट केलाय. नितीश कुमार यांच्यासोबत दीर्घकाळ उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. मात्र यावेळी पक्षाने दुसऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे मोदी हे नाराज असल्याचंही बोललं जातं. पक्षाचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मोदी हे नाराज नाहीत. पक्ष त्यांच्या अनुभवाचा उपयोग नक्की करून घेणार असल्याचं सांगितलं. ते पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात सत्ता वाटपाचा अनुभव पाठिशी असल्याने पक्षाने सुशील कुमार मोदी यांचं मन वळविण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकली होती. फडणवीस म्हणाले, सुशील कुमार मोदी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊ. त्यांना पक्षात वेगळी जबाबदारी दिली जाणार आहे. लोकांनी एनडीचं सरकार राज्यात निवडून दिलं असून ते 5 वर्ष काम करणार आहे. असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा...16 वर्षांनंतर ही आंतरराष्ट्रीय टीम पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणार

तर सुशील कुमार मोदी यांना संधी का दिली नाही ते मला माहित नाही. हा प्रश्न आणि त्याचं उत्तर भाजपकडूनच मिळवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी व्यक्त केली. अशा प्रसंगी सुशील कुमार मोदींची आठवण येते का या प्रश्नावर त्यांनी होय असं उत्तर दिलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 18, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading