नवी दिल्ली, 23 एप्रिल : आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिलासादायक बातमी दिली आहे. गेल्या 24 तासांत 1409 नवी कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण समोर आले असले तरी रुग्णांच्या प्रकृतीत सुधारही होत आहे. रुग्णांची प्रकृती सुधारत असून हा दर 19.89 टक्के इतका आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील 12 जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांत कोरोना व्हायरसचा (Covid - 19) एकही रुग्ण समोर आलेला नाही. याशिवाय देशातील 23 राज्यांतील 78 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 21000 च्या पुढे गेली असली तरी गेल्या 23 राज्यांच्या 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. आतापर्यंत भारतात COVID-19 मुळे 681 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण 4257 माणसं बरी होऊन कोरोनामुक्त झाली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात 21393 कोरोनाग्रस्त आहेत. हॉटस्पॉट झाले कमी पण धोका कायम; राज्याचं लक्ष आता या 5 धोकादायक केंद्रांकडे मुख्य म्हणजे कोरोना चाचण्या वाढल्या असल्या तरी रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर मात्र वाढलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. चाचण्या वाढल्यावर रुग्णवाढीचा वेग वाढण्याची शक्यता होती. पण देशव्यापी लॉकडाऊनमुळे या विषाणूचा फैलाव आटोक्यात राहिला असल्याचं चिन्ह आहे. देशात कोरोनाची संख्या वाढत असली तरी आपल्याकडे मृत्यूदर हा कमी आहे. शिवाय चाचण्या मोठ्या संख्येने घेतल्या जात असून त्यापैकी बाधित रुग्णसंख्या कमी आहे. याशिवाय राज्यात गंभीर रुग्णांची संख्या केवळ 1टक्के असल्याचे बाब आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. संबंधित - कल्याण डोंबिवलीकरांसाठी GOOD NEWS, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय तबलिगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाला हरवलं, आता असा वाचवणार दुसऱ्या रुग्णांचा जीव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.