जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतावरील दहशतवादी हल्ले वाढणार? अफगाणिस्तानात पाय पसरत आहे TTP संघटना

भारतावरील दहशतवादी हल्ले वाढणार? अफगाणिस्तानात पाय पसरत आहे TTP संघटना

भारतावरील दहशतवादी हल्ले वाढणार? अफगाणिस्तानात पाय पसरत आहे TTP संघटना

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान एक मोठी दहशतवादी संघटना बनली आहे आणि पाकिस्तानचे सर्व जिहादी गट त्यात सामील होत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 सप्टेंबर : अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर (Taliban Rule) जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवादी हल्ले (Terrorist Attacks) वाढू शकतात. भारताच्या अंतर्गत सुरक्षा अहवालात हे उघड झाले आहे. खरं तर, तालिबानच्या राजवटीत इतर देशांतील दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan Updates) चांगलं वातावरण मिळेल. सीएनएन-न्यूज 18 ला अंतर्गत सुरक्षा अहवालाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल जिहाद भारतासमोर एक मोठे आव्हान बनू शकते. अफगाणिस्तानातील नाटो आणि अमेरिकन सैन्याचा पराभव जगभरासाठी चिंतेचं कारण बनलं आहे. अहवालात म्हटलं आहे, की जगभरात जिहादी कारवाया 9/11 च्या हल्ल्याच्या तुलनेत 400 पटीने वाढल्या आहेत. जागतिक जिहाद जगभरात वाढत असल्याचं दिसतं आणि जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा पराभव जिहादी शक्तींना बळ देणारा आहे. EXCLUSIVE: या गावात होत नाहीत लग्नं, सगळे तरुण आहेत अविवाहित या मूल्यांकनात असं म्हटलं गेलं आहे, की तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान एक मोठी दहशतवादी संघटना बनली आहे आणि पाकिस्तानचे सर्व जिहादी गट त्यात सामील होत आहेत. अगदी टीटीपी विरोधी गटही. अशा स्थितीत जिहादी कारवाया केवळ जम्मू -काश्मीरमध्येच नव्हे तर दक्षिण आशियातील इतर भागातही वाढू शकतात. यामध्ये बांगलादेश, मालदीव, श्रीलंका सारख्या देशांचा समावेश आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना त्यांच्या फाटा भागातून काढून अफगाणिस्तानच्या भागात हलवण्याचा प्रयत्न करेल. यासह, ड्रग दहशतवाद देखील या प्रदेशात वेगाने पसरेल. ड्रग्स दहशतवाद दोन पटीने वाढू शकतो कारण तालिबानला पैशाच्या बदली काहीतरी किंमत मोजावी लागेल. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच, सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला अहवालानुसार, 20 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेवर हल्ला केला. आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दहशतवादी गटांकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यानं परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या पाठिंब्याने अफगाणिस्तान आता संपूर्ण जगाच्या जिहादी शक्तींचा गड बनू शकतो. जगाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे राहणार नाही. भारताकडून वाढणारा खरा धोका लक्षात घेता, तरुणांमध्ये अधिक विकासाभिमुख कार्यक्रम सुरू केले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात