रांची, 10 सप्टेंबर : भारत (India) महासत्ता (world power) होण्याची स्वप्नं पाहत असताना अनेक गावं अशी आहेत, जिथं साध्या पायाभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीपासून (Ranchi) काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये सध्या मूलभूत पायाभूत सुविधादेखील (Basic infrastructure) नसल्यामुळे या भागात एकही मुल(girl) गी लग्न (Marriage) करायला तयार होत नाही.
पुलाचा प्रश्न
रांचीपाशी असणाऱ्या कोनकी पंचायत या भागातील आदिवासी भागात जाण्यासाठी साधा पूलदेखील नाही. या भागातील आदिवासी भागात जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते. या नदीवर अनेक वर्षांपासून साधा पूलदेखील बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात एकदा नदीला पूर आला की बाहेरून गावात जाता येत नाही आणि गावातूनही बाहेर पडता येत नाही.
गावात होत नाही लग्न
या गावात गेल्या अनेक वर्षांपासून लग्न झालेलं नाही. या गावची बिकट अवस्था पाहून कुणीही इथं आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. त्यामुळे गावातील अनेक तरुणांची लग्नाची वयं उलटूनदेखील त्यांना कुणीही मुलगी द्यायला तयार होत नाही. रांचीपासून केवळ 26 किलोमीटर दूर असूनदेखील या जंगली आणि दुर्गम भागात मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत.
एका तरुणीचा अऩुभव
या गावात 2011 साली शेवटचं लग्न झालं होतं. हेसा नाग नावाच्या तरुणीनं या गावातील एका तरुणाशी लग्न केलं. मात्र त्यानंतर आतापर्यंत एकदाही आपण शहरात जाऊ शकलो नाही, असं तिचं म्हणणं आहे. आपल्याला चांगले कपडे घालायला आणि नवरात्र उत्सव पाहायला रांचीला जायला आवडतं, असं हेसा सांगते. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीला मोठा पूर असतो. त्यामुळे आपल्याला गावातून बाहेरच पडता येत नसल्याचं तिनं म्हटलं आहे.
हे वाचा - भयंकर ! अमेरिकेतील शाळांमध्ये कोरोनाचा कहर, साडेसात लाख मुलांना लागण
कमालीची गैरसोय
या भागात जाण्यायेण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे इथे शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचीदेखील वानवा आहे. इथं पावसाळ्यात कुणाची तब्येत बिघडली, तरी त्याला वेळेत उपचार मिळत नाहीत. सरकारने याकडे लक्ष देऊन किमान एक पूल बांधावा, एवढीच इथल्या ग्रामस्थांची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.