Home /News /national /

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच, श्रीनगरच्या चनापोरामध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच, श्रीनगरच्या चनापोरामध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी (Terrorist) हल्ल्याची बातमी समोर आली आहे.

    श्रीनगर, 10 सप्टेंबर: जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी (Terrorist) हल्ल्याची बातमी समोर आली आहे. चनापोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील चनापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. तसंच एक महिला देखील जखमी झाल्याचं वृत्त आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF च्या संयुक्त टीमनं परिसराला घेराव घातला आहे. कबूल है! तालिबान करणार पाकिस्तानी चलनाचा स्वीकार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चनापोरा येथील CRPF BN 29 वर ग्रेनेड फेकला. या घटनेत एक सीआरपीएफ जवान आणि एक नागरिक (महिला) किरकोळ जखमी झाले आहेत. याआधीही ग्रेनेड हल्ला यापूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग येथील एका पोलीस चौकीवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेडनं हल्ला केला होता. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा एक मोठा कट उघडकीस आला आहे. एका गुप्तचर अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान काश्मीरमधील लोकांना अफगाणिस्तानचे व्हिडिओ दाखवून त्यांना भडकवण्याचे षडयंत्र रचत आहे. इतकंच नाही तर पाकिस्तान काश्मीरला इस्लामिक राज्य म्हणत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या