मराठी बातम्या /बातम्या /देश /Alert! देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणेकडून या शहरांना इशारा

Alert! देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणेकडून या शहरांना इशारा

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा (Terrorist Attack) कट रचत असल्याचा महत्त्वपूर्ण इशारा देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी जारी केला आहे.

चंदीगड 21 ऑगस्ट : देशात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असल्याचा महत्त्वपूर्ण इशारा देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी जारी केला आहे. यानंतर चंदीगडचे सेक्टर 43 बस स्टँड पोलीस सीआरपीएफ क्विक रिअॅक्शन टीमसह तपास करत आहेत.

BREAKING : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी, 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा

कोणत्याही प्रकारे संशय आल्यास त्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.अलर्टनुसार चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ला करू शकतात. दहशतवादी बस स्टँडला लक्ष्य करू शकतात, अशी शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टनंतर पंजाब पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले आहेत.

यामध्ये काही नेत्यांना टार्गेट करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. या अलर्टमुळे सरकार काही नेत्यांना अतिरिक्त सुरक्षाही देण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ज्या लोकांशी आयएसआयचे संबंध आहेत त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Breaking : सोमालियामध्ये मुंबईसारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि अंदाधुंद गोळीबार

गुप्तचर यंत्रणांनी राज्य पोलीस, जीआरपी आणि राज्य गुप्तचर संस्थेला आपापसात समन्वय साधून इनपुटवर काम करण्यास सांगितलं आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा मोठा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Terror acttack