सोमालिया : मुंबईसारखा हल्ला पुन्हा एकदा सोमालियातील हॉटेलमध्ये झाला. या हल्ल्यानं २६/11 च्या वाईट आठवणी त्या जखमा पुन्हा समोर आल्या. मुंबईसारखा दहशतवादी हल्ला सोमालियामध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी शस्त्र घेऊन हॉलमध्ये घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
या घटनेमध्ये १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ९ लोक जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोहादिशु (Mogadishu) इथल्या हयात हॉटेलमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.
Al-Shabaab gunmen attack hotel in Mogadishu in Somalia, casualties reported, reports AFP citing security sources & witnesses
— ANI (@ANI) August 19, 2022
दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि दोन कार स्फोट घडवून आणले. त्याचवेळी अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती मिळाली आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तिथे सुरक्षा दलाचे जवान आणि जिहादी समूहाच्या हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. दहशतवादी हॉटेलमध्ये घुसण्याच्या एक मिनिट आधी बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर हॉटेलमध्ये घुसून गोळीबार करण्यात आला.
या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आधी स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. यामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नागरिकांना या स्फोटाचा फटका बसला. त्यानंतर दहशतवादी हयात हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.