मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी, 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा

BREAKING : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी, 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा

26/11 हल्ला (फाईल फोटो)

26/11 हल्ला (फाईल फोटो)

26/11 सराखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे. (Terrorist Attack in Mumbai)

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 20 ऑगस्ट : 26/11 रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले होते. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सराखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे.

ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

Breaking : सोमालियामध्ये मुंबईसारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि अंदाधुंद गोळीबार

मेसेजमध्ये काय लिहिलं आहे -

अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही, तर प्रत्यक्षात येतोय. माझं लोकेशन पाकिस्तानमध्ये दिसेल पण काम मुंबईत चालेल. आमचा काही ठिकाणा नसतो. लोकेशन तुम्हाला दुसऱ्याच देशाचं दसेल.

First published:

Tags: Mumbai News, Terrorist attack