नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: दोन-तीन दिवसांपूर्वी सरकारी शाळेतील एका शिक्षकानं विद्यार्थ्याचे केस पकडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियामध्ये अनेकांनी संताप व्यक्त केला होता. ही घटना ताजी असताना, शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने होमवर्क केला (7th grade student not complete homework) नाही म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला तालिबानी शिक्षा दिली आहे. आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण (teacher beat student) करत जमिनीवर आपटून जीव (student died in rajastan) घेतला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात हत्येच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक (Accused teacher arrested) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना राजस्थानातील चूरू जिल्ह्याच्या सालासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलासर येथील आहे. याप्रकरणी कोलासर येथील रहिवासी असणाऱ्या ओमप्रकाश यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी ओमप्रकाश यांचा मुलगा गणेश हा मॉडर्न पब्लिक स्कुल या खाजगी शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकतो. हेही वाचा- क्लास बुडवला म्हणून भयंकर शिक्षा; विद्यार्थ्याचे केस पकडून शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण, पाहा VIDEO गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गणेश नियमितपणे शाळेत जात होता. दरम्यान, बुधवारीही गणेश नेहमी प्रमाणे शाळेत गेला होता. पण यावेळी त्याने आपला होमवर्क केला नव्हता. होमवर्क न केल्याने शिक्षक मनोज कुमार याने गणेशला बेदम मारहाण केली आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर, शिक्षकाने गणेशला जमिनीवर आपटलं. यानंतर गणेश जागीच निपचित पडला. यानंतर आरोपी शिक्षक मनोज याने स्वत: गणेशचे वडील ओमप्रकाश यांना फोनवरून याची माहिती दिली. हेही वाचा- पुण्यात टोळक्याची दहशत; दिवसाढवळ्या दोन दुकानं फोडली, घटनेचा LIVE VIDEO तुमच्या मुलाने होमवर्क न केल्याने त्याला मारलं असून तो बेशुद्ध झाल्याची माहिती आरोपी मनोज कुमार याने ओमप्रकाश यांना दिली. घटनेची माहिती मिळताच, फिर्यादी ओमप्रकाश शेतातील कामं अर्धवट सोडून शाळेत दाखल झाले. यावेळी त्यांनी जमिनीवर निपचित पडलेल्या मुलाला पाहून विचारलं की, माझा मुलगा बेशुद्ध आणि की मेला आहे? यावेळी आरोपी मनोज कुमारने ‘तुमचा मुलगा मरण्याचं नाटक करतोय’ असं सांगितलं. या धक्कादायक प्रकारानंतर शाळेतील इतर विद्यार्थी देखील घाबरले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.