पुणे, 21 ऑक्टोबर: पुण्यातील येरवडा परिसरात चार अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या दोन दुकानांवर हॉकी स्टिकने हल्ला (4 minor boys attacked on 2 shops) केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी अचानक येऊन संबंधित दुकानावर हल्ला केला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV Footage) झाली आहे. आरोपींनी परिसरात दहशत माजवण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं असून पोलिसांनी अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना येरवडा परिसरातील जयप्रकाश नगर येथे घडली आहे. याठिकाणी आलेल्या चार अल्पवयीन मुलांनी येथील दोन किराणा दुकानं फोडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकारमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांमध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप समजू शकलं नाही. खरंतर, येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने असे अनेक छोटे-मोठे प्रकार वारंवार घडत असतात.
हेही वाचा-आई-वडील शेतात जाताच एकट्या मुलीवर साधला डाव; रेप आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं!
आणखी घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता, किराणा दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार अल्पवयीन तरुणांनी अचानक हॉकी स्टिकने हल्ला केला आहे. यावेळी आरोपींनी दुकानातील काही सामान आणि काचा फोडल्या आहेत. संबंधित आरोपी नेमके कोण आहेत, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
येरवडा येथे दोन दुकाने फोडली. दुकाने फोडतानाचा सर्व प्रकार झाला सीसीटीव्हीमध्ये कैद pic.twitter.com/oFsI4j3blr
— News18Lokmat (@News18lokmat) October 21, 2021
शहरात सुरू असलेली गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अनेक गावगुंडाविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. असं असलं तरी पुण्यातील येरवडा परिसरात गुन्हेगारी जोमात आहे. याठिकाणी दररोज नवनवीन गावगुंड उदयाला येत आहेत. हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune