चेन्नई, 18 ऑक्टोबर: एका सरकारी शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण (Student Inhuman beating) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वर्गातील काही विद्यार्थ्यांनी या संतापजनक घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (teacher inhuman beating video) झाल्यानंतर, नेटकऱ्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहेत. अनेकांनी शिक्षकाचा निषेध केला आहे. आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याचे केसं घट्ट पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना तामिळनाडू (Tamilnadu) राज्यातील कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम येथील उच्च माध्यमिक शाळेत घडली आहे. तर संबंधित विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव सुब्रमण्यम असून ते फिजिक्स विषयाचे शिक्षक आहेत. 'द न्यूज मिनिट'ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडीओत दिसणाऱ्या विद्यार्थ्यासह आठ जण बुधवारी फिजिक्सचा क्लासला गैरहजर राहिले होते. संबंधित विद्यार्थी पहिल्या क्लासला उपस्थित होते. पण दुसरा क्लास फिजिक्सचा असल्याने त्यांनी वर्गातून पळ काढला होता.
हेही वाचा-दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबतच्या कृत्यानं पुणे हादरलं!
दरम्यान संबंधित विद्यार्थी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेले दिसल्यानंतर, आरोपी शिक्षक सुब्रमण्यम यांनी संबंधित विद्यार्थ्यांना वर्गात आणून त्यांना अमानुष मारहाण केली आहे. दरम्यान वर्गातील काही विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांकडून शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
Caste cruelty in schools.
Physics teacher of a govt school brutally flogged and kicked a SC minor boy while holding him by his hair. This mind distracting video is from TN's Cuddalore. #CrushTheCaste pic.twitter.com/Tm4GTFTq8i — Mission Ambedkar (@MissionAmbedkar) October 15, 2021
विशेष म्हणजे,अशी चूक पुन्हा करणार नाही, अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिले आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्याचे केस पकडून छडीने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. वर्गातील काही विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाविरोधात रोष निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Tamilnadu