जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / #Breaking राज्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईमध्ये मृत्यू

#Breaking राज्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईमध्ये मृत्यू

भारत - आतापर्यंत 1251 लोकांना लागण आणि 31 मृत्यू. लोकसंख्या आणि परिस्थिती लक्षात घेता वेगवान संसर्गाची सर्वाधिक शक्यता आपल्या देशात आहे.

भारत - आतापर्यंत 1251 लोकांना लागण आणि 31 मृत्यू. लोकसंख्या आणि परिस्थिती लक्षात घेता वेगवान संसर्गाची सर्वाधिक शक्यता आपल्या देशात आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च : कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्येहे. एका 63 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) वेगाने पसरतो आहे. काल फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. शुक्रवारी कोरोनाव्हायरसच 50 रुग्ण आढळले होते. तर शनिवारी तब्बल 98 रुग्ण आढळले. फक्त 24 तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 रुग्ण बरे झालेत, तर आता मृतांची संख्या 5वर गेली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात