जाहिरात
मराठी बातम्या / देश / आता कोरोनाची टेस्ट खासगी लॅबमध्येही होणार, काय असेल किंमत जाणून घ्या

आता कोरोनाची टेस्ट खासगी लॅबमध्येही होणार, काय असेल किंमत जाणून घ्या

आता कोरोनाची टेस्ट खासगी लॅबमध्येही होणार, काय असेल किंमत जाणून घ्या

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता सरकारी लॅबसह खासगी लॅबमध्ये या टेस्ट करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून अधिकसूचना जारी करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च : कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 315 रुग्ण आढळले आहेत. शनिवारी आणखी नवीन 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातही हा आकडा जवळपास 60हून अधिक असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यापैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून लागण झाल्याचं समोर आलं आहे. सरकारी यंत्रणेवर येणारा भार लक्षात घेता आता कोरोना व्हायरसच्या टेस्ट खासगी लॅबोरेट्रीमध्ये करता येणार असल्याची माहिती मिळत आहे. 4,500 रुपयांना या टेस्ट नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. यामध्ये खासगी लॅबमधील कोरोनाच्या चाचण्यांसाठी 4,500 पेक्षा अतिरिक्त शुल्क आकारलं जावू नये असं सांगण्यात आलं आहे. हे वाचा- कोरोनामुळे या राज्यात ‘टोटल लॉकडाऊन’, पहिल्यांदाच सर्व शहरांना लागलं टाळं कोरोनाची चाचणी इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व एनएबीएल प्रमाणित खासगी प्रयोगशाळांना ही चाचणी घेण्यास परवानगी दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी रात्री ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना स्क्रिनिंग टेस्टसाठी एक हजार तर अतिरिक्त चाचण्यांसाठी 3,500 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते.राष्ट्रीय टास्क फोर्सने यासंदर्भात शिफारस केली होती. कोरोनाची चाचणी करण्यासाठी येणाऱ्याकडून जास्तीत जास्त 4,500 रुपये शुल्क आकारण्यात यावे. केंद्रीय मंत्रालयाकडून दिलेल्या निर्देशांक आणि सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या लॅबवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णाचे चाचणीसाठी नमूने घेताना आणि चाचणीदरम्यान योग्य ती काळजी घेणं आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हे वाचा- Live Updates : राज्यात कडकडीत बंद, कर्फ्यूदरम्यान कोणत्या सेवा आहेत सुरू?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात