मुंबई, 20 मे: तौक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा यासह दक्षिणेतील राज्यांनाही बसला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दौरा करून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी (Aerial Survey) केली. त्यानंतर गुजरातला 1000 कोटींची मदतही जाहीर (1000 crore relief package) केली. त्यानंतर यावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया देखिल चर्चेचा विषय ठरलीये. (वाचा- भाजप कार्यकर्त्यांनी फाडले मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन?’ चे पोस्टर्स, VIDEO ) खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, पंतप्रधानांनी गुजरातसाठी 1 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. गुजरात सुद्धा भारताचा भाग आहे. तिथे देखील नुकसान झाला आहे. तसंच पंतप्रधानांचं संपूर्ण देशावर लक्ष आहे. त्यामुळे त्यांचं विमान महाराष्ट्राकडेही वळेल, असं संजय राऊत म्हणाले. ‘गुजरातला जर एक हजार कोटींची मदत दिली असेल तर महाराष्ट्राला त्यांचं वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण पंतप्रधान लवकरच गोव्याला 500 कोटी रुपये मदत जाहीर करतील. कारण गोव्यातही मोठं नुकसान झालं आहे. तसंच महाराष्ट्राला बसलेला फटका पाहता पंतप्रधान महाराष्ट्राला दीड हजार कोटींची मदत जाहीर करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. (वाचा- कोरोना रुग्णांना सलमान देतोय मोफत ऑक्सिजन; मदत मिळवण्यासाठी या नंबरवर करा कॉल ) संजय राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, ‘राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. किती प्रचंड प्रमाणावर नुकसान झालं याची पाहणी ते करतायत. ते देखिल केंद्राला त्यांचा अहवाल सादर करतील. ते भाजपचे नेतेही आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राला अधिक मदत मिळण्याची शिफारस करतील.’ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणच्या दौऱ्यावर जात आहेत. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून राज्य सरकारच्या वतीने देखिल केंद्राला मागणी केली जाईल. त्यामुळे राज्याला पंतप्रधान मोदी नक्कीच 1500 कोटींची मदत जाहीर करतील असा विश्वास आपण ठेवायला हवा, असंही राऊत म्हणाले. तसंच केंद्रातील नेते अत्यंत दिलदार आहेत, त्यामुळं ते चांगली मदत जाहीर करतील असा टोलाही शेवटी राऊत यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







