Home /News /mumbai /

'भारत माता की जय' म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी फाडले 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन?' चे पोस्टर्स, VIDEO

'भारत माता की जय' म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी फाडले 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन?' चे पोस्टर्स, VIDEO

'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?' आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला...

मुंबई, 20 मे : देशभरात कोरोना लशीचा (corona vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे.  त्यामुळे पंतप्रधान मोदींविरोधात दिल्लीनंतर आता मुंबईतही 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन?' असे पोस्टरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर आता फाडून टाकले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये कोरोना लशीसंदर्भात टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली. 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?' आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. काँग्रेसकडून हे पोस्टर लावण्यात आले होते. दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसने घाटकोपर परिसरात लावलेले होर्डिंज भाजपच्या कार्यकर्त्यांनी फडले. तसंच, होर्डिंग लावणाऱ्या विरूद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी मुंबई पालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे. भारत माता की जय म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग फाडून टाकले. लोकप्रिय गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनानं निधन; कोलकात्यात अखेरचा श्वास घाटकोपरमध्ये विविध भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नाव होती. यामध्ये आमदार भाई जगताप, मा.आमदार चरणसिंग सप्रा, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अब्राहम रॉय मणी आणि ब्रिजेश रवि भाटला या पदाधिकाऱ्यांची नाव होती.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Congress

पुढील बातम्या