मुंबई 20 मे**:** कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (Coronavirus in Maharashtra) वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषधं, लसी यांचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी तर योग्य वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळं रुग्ण देखील दगावले आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत गरजूंची मदत करण्यासाठी इतर सेलिब्रिटींसोबतच आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) देखील पुढे सरसावला आहे. त्यानं रुग्णांच्या मदतीसाठी खास रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन कंसंट्रेटरची सुविधा केली आहे. (oxygen concentrator) कशी मागाल सलमान खानकडे मदत**?** ज्या प्रमाणे सोनू सूद आणि इतर काही सेलिब्रिटींनी मदत देण्यासाठी एका हेल्प लाईन नंबरची मदत गरजूंना दिली अगदी त्याच प्रमाणे सलमाननं देखील एक खास हेल्प लाईन नंबर सुरु केला आहे. 8451869785 या फोन नंबरवर फोन करुन तुम्ही मदत मागू शकता. (Coronavirus helpline number) यावरुन तुम्हाला ऑक्सिजन कंसंट्रेटरसोबत इतरही मदत पुरवी जाईल. सलमाननं लोकांच्या मदतीसाठी तब्बल 500 ऑक्सिजन यंत्रांची सुविधा केली आहे. ही सर्व यंत्र सध्या मुंबईत आहेत. सलमाननं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन ही महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. सोबतच कोणीही काळजी करु नये मी तूमच्यासोबत आहे भरवसा देखील दिला आहे. त्याच्या या मदतीसाठी सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. VIDEO: पाणी कधी, केव्हा आणि कसं प्यावं? पाहा प्राजक्ता माळीनं दिलेल्या खास टीप्स
सलमान आणि इतर सेलिब्रिटींपूर्वी नागपूरमधील एक व्यवसायिकानं महराष्ट्रातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्याची सुविधा केली होती. या व्यवसायिकाचं नाव प्यारे खान अस असून त्यांनी तब्बल 85 लाख रुपये यासाठी खर्च केले होते. गेल्या महिन्याभरात त्यांनी तब्बल 400 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला आहे. सध्या त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतच आता बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील अशा पद्धतीने रुग्णांची मदत करत आहेत. यामध्ये आता सलमाननं देखील मदतीचा हात पुढे केला आहे.