मराठी बातम्या /बातम्या /देश /

जम्मूतील कठुआमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला, दहशतवाद्यांचं लक्ष्य चुकल्याने मोठा अनर्थ टळला

जम्मूतील कठुआमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला, दहशतवाद्यांचं लक्ष्य चुकल्याने मोठा अनर्थ टळला

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांकडून कुरघोडी सुरच आहे. याठिकाणी आणखी एक ग्रेनेड हल्ला झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांकडून कुरघोडी सुरच आहे. याठिकाणी आणखी एक ग्रेनेड हल्ला झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांकडून कुरघोडी सुरच आहे. याठिकाणी आणखी एक ग्रेनेड हल्ला झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 31 डिसेंबर: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांकडून कुरघोडी सुरच आहे. याठिकाणी आणखी एक ग्रेनेड हल्ला झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जम्मूतील कठुआ (Kathua) मधील मंदिरावर (Attack On Temple) बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी (Militant) ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा नेम चुकल्याने ग्रेनेड (Grenade) मंदिरावर न पडता बाजूच्या परिसरात पडला पण या हल्ल्याने आणि स्फोटाने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कठुआमधील (Kathua) हिरानगर भागात असणाऱ्या मंदिरावर(Attack On Temple) दहशतवाद्यांनी (Militant) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांचा नेम चुकल्याने ग्रेनेड (Grenade) तेथील मोकळ्या जागेत पडला. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती कठुआचे पोलीस अधीक्षक शालिंदर मिश्रा यांनी दिली आहे. जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले नवीन नाहीत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चार दहशतवाद्यांना जम्मूतील पूंछमध्ये अटक केली होती. या ठिकाणी ग्रेनेड हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर हा बुधवारचा हल्ला करण्यात आला आहे. (हे वाचा-शाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश वादात) दरम्यान, येथील शांतता नष्ट करण्याचे आणि नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम काही वर्षांपासून पाकिस्तानकडून सुरु आहे. या ठिकाणी सतत दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी होत असतात. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना आणि सुरक्षा दलांना यश आलं आहे. परंतु दहशतवाद्यांना यातून धडा मिळालेला नसून हे हल्ले अजूनही सुरूच आहेत. (हे  वाचा-4 महिन्यांच्या चिमुकल्याची तब्येत बिघडल्यानं विमानाचं इमरजन्सी लँडिंग पण...) दरम्यान यावर्षी अनेक दशकांनंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोकळ्या आणि निर्भयी वातावरणात झाल्या. यामुळे तिथे दहशत पसरवू इच्छिणाऱ्या पाकिस्तानच्या पायांखालील जमीन सरकू लागली आहे. त्यातूनच येथील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहशतवादी हल्ले घडवून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न याआधीही जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. या ग्रेनेड हल्ल्याची चौकशी करून कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
First published:

Tags: Jammu and kashmir, Terrorist

पुढील बातम्या