इंदौर, 31 डिसेंबर : विमानाचं उड्डाण झाल्यानंतर काही वेळानं 4 महिन्यांच्या चिमुकल्याची तब्येत अचानक बिघडली आणि विमानाचं इमरजन्सी लँडिंग करावं लागलं. या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दिल्ली-बंगळुरू विमानाने इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. 4 महिन्यांचा एक मुलगा देखील फ्लाइटमध्ये प्रवास करीत होता, अचानक त्याला त्रास होऊ लागला. या चिमुकल्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते मुलाला हायड्रो सिफिलस नावाचा आजार होता. या आजारावर उपचार करण्यासाठी आई-वडील मुलासह दिल्लीहून बंगळुरुला विमानाने निघाले होते.
हे वाचा-घरच्यांशी बंड करत ही झाली जम्मू-काश्मीरमधली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E 2248 संध्याकाळी 5.35 वाजता दिल्लीहून बंगळुरूला निघाली. विमानात गोरखपूर येथील दुर्गेश जयस्वाल आणि अनु जैस्वाल हे चार महिन्यांचा मुलगा देव जयस्वाल यांच्यासह प्रवास करीत होते. उड्डाण दरम्यान मुलाची तब्येत ठीक होती, पण उड्डाणानंतर काही वेळानं त्याची तब्येत खालवली. इंदूरमध्ये संध्याकाळी विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं आणि तातडीनं तीन मिनिटांवर असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या रुग्णालयानं शैल्बी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आणि तिथून अरबिंदो रुग्णालयात दाखल कऱण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे पोहोचेपर्यंत या 4 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी या चिमुकल्याला मृत घोषित केलं होतं. शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकल्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.