मराठी बातम्या /बातम्या /देश /

शाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने केला भाजप प्रवेश, पण काही तासांतच..

शाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने केला भाजप प्रवेश, पण काही तासांतच..

एखाद्या कार्यकर्त्याला उत्साहाने हार-तुरे घालत पक्षात प्रवेश द्यायचा आणि पुढच्या काही तासांतच निर्णय फिरवून पक्षातून काढून टाकलं असं कधी ऐकलं नसेल

एखाद्या कार्यकर्त्याला उत्साहाने हार-तुरे घालत पक्षात प्रवेश द्यायचा आणि पुढच्या काही तासांतच निर्णय फिरवून पक्षातून काढून टाकलं असं कधी ऐकलं नसेल

एखाद्या कार्यकर्त्याला उत्साहाने हार-तुरे घालत पक्षात प्रवेश द्यायचा आणि पुढच्या काही तासांतच निर्णय फिरवून पक्षातून काढून टाकलं असं कधी ऐकलं नसेल

  • Published by:  News18 Desk
गाझियाबाद, 30 डिसेंबर: केंद्र सरकारनं सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) लागू केल्यानंतर या कायद्याला देशभरातून विरोध झाला तर काही ठिकाणी या कायद्याला समर्थनही देण्यात आलं होतं. CAA लागू झाल्यानंतर दिल्लीतील शाहीन बाग येथे मुस्लीम महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन देशातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक ठरलं होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही शाहीन बाग आंदोलन चर्चेमध्ये राहिलं.CAA ला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं म्हणत काही कार्यकर्त्यांनी त्यांना हिंसक विरोधही केला. त्याच वेळी एका युवकाने शाहीन बागेतल्या आंदोलकांवर गोळीबार केला. त्याचा VIDEO सुद्धा समोर आला. आता याच कथित कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि थोड्यात वेळात पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करत हा प्रवेश नाकारलासुद्धा. 2020 वर्षाच्या सुरुवातीला देशभरात CAA आणि NRC या कायद्यांमुळे देश पूर्णपणे पेटून उटला होता. या आंदोलनाची ठिगणी जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठातून पडली होती. तीन महिन्यापेक्षा अधिक काळ मुस्लीम महिलांनी शाहीन बाग येथे केलेल्या आंदोलनात अनेक वेळा हिंसाचार झाला होता. कपिल गुर्जर नावाच्या युवकानं तर तिथे जाऊन गोळीबारही केला होता. या कपिल गुर्जरची बातमी आणि नाव त्या वेळी समोर आलेल्या VIDEO मुळे सर्वदूर पसरलं. या हिंसाचारामुळे आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं होतं. या घटनेनंतर कपिल गुर्जर हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचाही आरोप झाला होता. त्यामुळं आम आदमी विरोधी भाजप असा संघर्ष उभा राहिला होता. आता हे आंदोलन शांत झाल्यानंतर कपिल गुर्जर यानं गुरुवारी भाजपत प्रवेश केला. हार-तुरे देऊन त्याचं स्वागतही झालं. आपण सुरुवातीपासून संघाशी (RSS) जोडलेलो असल्याचं या वेळी बोलताना कपिलने सांगितलं. हिंदुत्वासाठी काम करायचं आहे, म्हणून भाजपमध्ये प्रवेश करतो आहे, असं सांगत त्याचा रीतसर पक्षप्रवेश झाला. पण थोड्या वेळातच पक्षातल्या काही मान्यवरांना याच्या परिणामांची जाणीव झाली असावी. काही तासांतच हा निर्णय फिरवण्यात आला. कपिल गुर्जरला पक्षात सामील करण्याचा निर्णय आम्ही तत्काळ रद्द करत आहोत, असं भाजपच्या गाझियाबादच्या शहराध्यक्षांना सांगावं लागलं. भाजपने कपिल गुर्जर पक्षप्रवेश प्रकरणी घूमजाव केलं असून कपिल गुर्जरला भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यावेळी गाझियाबादचे भाजपचे नगराध्यक्ष म्हणाले की, 'आज काही तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये कपिल गुर्जरही होता. शाहीनबाग येथे झालेल्या गोळीबारासंदर्भातली विवादीत पार्श्वभूमी आम्हाला माहित नव्हती. त्यामुळे आम्ही कपिल गुर्जरला भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेत आहोत.'
First published:

Tags: BJP, Caa

पुढील बातम्या