शाहजहाँपूर, 09 एप्रिल : लॉकडाऊनदरम्यान प्रियकराला भेटण्यासाठी तरुणीनं जीवाचं रान केलं. कोणतंही वाहन किंवा मदत मिळत नसताना तब्बल 70 किलोमीटर चालून ती प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली. त्याला पाहण्यासाठी आणि भेटण्याची प्रियकराच्या कुटुंबियांना विनंती करू लागली. मात्र काहीच ऐकून न घेता प्रियकराच्या कुटुंबियांना त्याचा तमाशा केला. दोघंही एकमेकांवर प्रेम करतात हे ऐकून न घेताच प्रियकरालाही त्याच्या घरातून बाहेर हाकलून दिलं. हा धक्कादायक प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर इथे. पीलीभीत जिल्ह्यातून 70 किमी चालून तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पडरी चांदूपूर गावात आली. या दोघांचंही एक वर्षाआधी लग्न ठरवत होते. एक वर्ष उलटून गेल्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी लग्न करून देण्यास विरोध दर्शवला. वेगवेगळी कारण देऊन लग्न टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी 70 किमी चालत त्याच्या घरी पोहोचली आणि तिथेही त्यांना सहकार्य मिळालं नाही.
हे वाचा-BREAKING: कोरोनामुळे या राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन
एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या युगुलानं अखेर पोलीस स्थानक गाठलं.
तरुणी प्रियकराच्या घरी जाऊन लग्नचा हट्ट करू लागली. त्यावर प्रियकराच्या कुटुंबियांनी तमाशा सुरू केला. त्यांनी दोघांनाही हाकलून दिलं. ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आणि त्यांना लग्न करायचं आहे हे म्हणणं कुणीच ऐकून घेण्यासाठी तयार नाही हे पाहून दोघंही पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी लॉकडाऊन असल्याचं सांगत दोघांनीही नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी इशारा दिला आणि दोघांनीही आपापल्या घरी जाण्याचे आदेश दिले.
उत्तर प्रदेशातील 15 जिल्हे 14 एप्रिलपर्यंत केले सील
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांमधील हॉटस्पॉट भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री 12 ते 15 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत हे भआग सील करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने हॉटस्पॉट क्षेत्रावर पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये लखनौ, आग्रा, गाझियाबाद, गौतम बुध नगर, कानपूर, वाराणसी, शामली, मेरठ, बरेली, बुलंदशहर, फिरोजाबाद, महाराजगंज, सीतापूर आणि सीतापूर सहारनपूर जिल्ह्याची नावं आहेत.
हे वाचा-पुण्यात कोरोचा कहर वाढतोय, आणखी दोघांचा मृत्यू, एकूण आकडा 20वर
संपादन- क्रांती कानेटकर