जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी

**EDS: VIDEO GRAB** New Delhi: Prime Minister Narendra Modi gestures as he addresses the nation on coronavirus pandemic, in New Delhi, Tuesday, March 24, 2020. (DD NEWS/PTI Photo) (PTI24-03-2020_000366B)

**EDS: VIDEO GRAB** New Delhi: Prime Minister Narendra Modi gestures as he addresses the nation on coronavirus pandemic, in New Delhi, Tuesday, March 24, 2020. (DD NEWS/PTI Photo) (PTI24-03-2020_000366B)

केंद्र सरकारने राज्य हेल्थ सिस्टम (India Health Systems) सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण फंड देण्यास मंजूरी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus Covid-19)विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने राज्य हेल्थ सिस्टम (India Health Systems)  सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण फंड देण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने इंडिया कोव्हिड-19 रिस्पॉन्स हेल्श सिस्टिम पॅकेज (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package)ची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये खर्चासाठी देण्यात येणारी पूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. (हे वाचा- लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला मोठा फटका ) आरोग्य विभागातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि संसाधन अधिक उत्तम करण्यासाठी या पॅकेजची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. जानेवारी 2020 ते मार्च 2024 पर्यंत तीन टप्प्यामध्ये या पॅकेजची विभागणी करण्यात आली आहे. यादरम्यान केंद्र सरकार राज्य सरकारांना मदत करणार आहे. पहिला टप्पा - जानेवारी 2020 ते जून 2020 दुसरा टप्पा-जुलै 2020 ते मार्च 2021 तिसरा टप्पा- एप्रिल 2021 ते मार्च 2024 या पॅकेजअंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी पैसे पाठवण्यात आले असून या पैशांचा वापर  Covid हॉस्पिटल, आयसोलेशन वार्ड, ICU, व्हेंटिलेटर्स, ऑक्सीजनचा पुरवठा, लॅब, पीपीई, मास्क, हेल्थ वर्कर्सची नियुक्ती यासाठी करण्यात येणार आहे. पॅकेजमधील 5  महत्त्वाच्या बाबी -नॅशनल हेल्थ मिशनच्या डिरेक्टर वंदना गुरुनानी यांनी एक पत्रक जारी करून सांगितले आहे की, 100 केंद्राचे फंड असणारा हा प्रोजेक्ट जानेवारी 2020 ते मार्च 2024 पर्यंत 3 टप्प्यांत लागू करण्यात येणार आहे. -या प्रोजेक्ट अंतर्गत कोरोनाचे संक्रमण रोखण्याच काम केलं जाईल. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर आरोग्य विभाग मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मेडिकल उपकरणे, लॅब निर्मिती, औषधांची खरेदी तसंच बायो-सिक्युरिटी यांसारख्या बाबी पक्क्या करण्याचा मानस आहे. -हे पत्रक सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव हेल्थ कमिशनर्सना पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये तात्काळ जारी करण्यात आलेल्या फंडबाबत नमूद करण्यात आले आहे. (हे वाचा- कोरोनाच्या संकटकाळात खूशखबर! या कंपनीने कर्मचाऱ्यांचा पगार 25 टक्क्यांनी वाढवला) -पहिल्या टप्प्यात  Covid 19 साठी हॉस्पिटल वाढवणे, आयसोलेशन वार्ड, ICU, व्हेंटिलेटर्स, ऑक्सीजनचा पुरवठा, लॅब, पीपीई, मास्क, हेल्थ वर्कर्सची नियुक्ती हे काम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लॅब दुरुस्तीचं कामही करण्यात येणार आहे. -पहिल्या टप्प्याअंतर्गत लॅब आणि रुग्णवाहिकांमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. अहवालानुसार, केंद्रीय पॅकेजमधून राज्यात सुरक्षा उपकरण (PPE), N95 मास्क आणि व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. संपादन-जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात