मुंबई, 3 मार्च : तामिळनाडूमध्ये एका प्रचार सभेला संबोधित करताना गृहमंत्री आणि भाजप नेत अमित शहा यांनी काँग्रेस, डीएमकेवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या भाषणातली एक क्लिप कमालीची viral होत आहे. यामध्ये ते तमीळ जनतेला 2जी, 3जी, 4जी चा अर्थ सांगत आहेत. तमीळ जनतेला समजावं यासाठी अमित शाहांच्या हिंदी भाषणाचा अनुवाद तमीळ मध्ये केला जात असतानाच अनुवादकाला मध्येच थांबवत शाहा हसत हसत म्हणतात, 'ये ढंग से ट्रान्सलेशन नही करते' मी तुम्हाला समजेल असं सांगतो, असं सांगत त्यांनी या प्रचारसभेत 2G, 3G, 4G चा खरा अर्थ सांगत मजबूत टाळ्या घेतल्या.
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचारसभाही जोरदा सुरू झाल्या आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची एक सभा या क्लिपमुळेच गाजली. काँग्रेस, डीएमकेतल्या घराणेशाहीवर टीकेची झोड उठवली. तसंच 2जी, 3जी, 4जी चा नवा फुलफॉर्म सांगत दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. (Tamilnadu Assembly Election 2021)
अमित शाह म्हणाले, 2जी, 3जी, 4जी हे सर्व तामिळनाडूमध्ये आहेत. 2जी म्हणजे मारण कुटुंबाच्या दोन पिढ्या. 3जी म्हणजे करुणानिधी कुटुंबाच्या 3 पिढ्या आणि 4जी म्हणजे गांधी परिवाराच्या 4 पिढ्या. हेही तामिळनाडूमध्ये आपल्याला सापडतात. (Tamilnadu Amit Shah speech)
डीएमकेच्या नेतृत्वातील काँग्रेस आघाडीवर टीका करताना ते पुढे म्हणाले, एआयएडीएमके-भाजप यांच्या एनडीएला देशाच्या संरक्षणासोबतच गोरगरीबांच्या कल्याणाचंही काम करायचंय. देशाच्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणायचं आहे. तर दुसरीकडे डीएमके आणि काँग्रेसला केवळ आपल्या कुटुंबाची चिंता सतावते आहे. ते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत. (Amit Shah taunts Congress and DMK)
हेही वाचा पंतप्रधान मोदींच्या सभेत गांगुलीचं राजकीय पदार्पण? भाजपाकडून सूचक प्रतिक्रिया
अमित शाह यांनी तामिळनाडूतल्या विलुप्पुरम इथे एका प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी आपल्याला तामिळ भाषा येत नाही, त्याबद्दल उपस्थितींपुढे दिलगिरीही व्यक्त केली. 'तामिळ ही भारतातली सर्वांत जुनी आणि सुमधूर भाषा आहे. पण मी तुम्हाला तामिळ भाषेत बोलू शकत नाही याची मोठी खंत मला वाटते', असं ते म्हणाले. (Puducherry rally Amit shah speech)
Sri @AmitShah is at his best:
✓ 2G = 2 Generations of Maran family
✓ 3G = 3 Generations of Karunanidhi family
✓ 4G = 4 Generations of Gandhi
Scam = Business
— मुरली धर (@murli_dhar) March 3, 2021
दरम्यान, अमित शाह यांनी यावेळी बोलताना डीएमके आणि काँग्रेसवर 12 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप लावला. यूपीए सरकारच्या काळात 2 जी स्पेक्ट्रम वाटपावरून भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला होता. त्याचाच धागा पकडत अमित शाहांनी 2जी, 3जी आणि 4जी चा नवा लाँगफॉर्म सांगत काँग्रेस, डीएमकेवर निशाणा साधला. (Amit Shah speaks at Puducherry)
हेही वाचा मोदी-शाहांच मॅजिक चालणार की दीदी पुन्हा गड राखणार? हे आहेत Opinion Poll चे आकडे
विरोधी पक्षांच्या घराणेशाहीबद्दल अमित शाह पुढे म्हणाले, 'स्टॅलिनजी भ्रष्टाचाराच्या बाता करतात. अरे पण तुम्ही थोडं आत्मपरीक्षण करा. 2जी घोटाळा कुणी केला होता? तुमच्या आसपासच सर्वकाही सुरू आहे आणि तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी करत आहात. तुमच्या आप्तेष्टांचे किती मोठमोठे महाल तयार झालेत. सोनियाजींना राहुल बाबांना पंतप्रधान बनवण्याची चिंता सतवतेय. स्टॅलिनजींना उदयनिधींना मुख्यमंत्री बनवायचंय. त्यांना ना देशाची चिंता ना तामिळनाडूची. त्यांना केवळ आपल्या कुटुंबाचं पडलं आहे.'