जाहिरात
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान मोदींच्या सभेत सौरव गांगुलीचं राजकीय पदार्पण? भाजपाकडून सूचक प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींच्या सभेत सौरव गांगुलीचं राजकीय पदार्पण? भाजपाकडून सूचक प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींच्या सभेत सौरव गांगुलीचं राजकीय पदार्पण? भाजपाकडून सूचक प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सात मार्च रोजी कोलकातामध्ये सभा आहे. या सभेला टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) उपस्थित राहणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 03 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा (West Bengal Assembly Election 2021) निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. बंगालमध्ये 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात निवडणुका होणार असून 2 मे रोजी निकाल जाहीर होतील. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा गड असलेल्या बंगालमध्ये सत्ता मिळण्याचा भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. याचाच भाग म्हणून सात मार्च रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत (PM Narendra Modi Election Rally) संपूर्ण देशाला एक मोठी गोष्ट पाहायला मिळू शकते अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांची सात मार्च रोजी कोलकातामध्ये सभा आहे. या सभेला टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) उपस्थित राहणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या बातमीला भाजपा किंवा गांगुली यापैकी कुणीही अजून दुजोरा दिलेला नाही. भाजपा प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी या विषयावर एक सूचक उत्तर दिलं आहे. ‘माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं या सभेत उपस्थित राहण्याचं ठरवलं तर त्यांचं सर्वात जास्त स्वागत होईल, असं भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे. गांगुलीनं त्याच्या तब्येतीचा विचार करत सभेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर नक्कीच गर्दी जास्त होईल. कारण गांगुली खूप लोकप्रिय आहेत, याबाबत अजून निश्चित काही ठरलेलं नाही,’ असं भाजपाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. (हे वाचा- राहुल गांधी म्हणाले, ‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण…' ) सौरव गांगुलीला जानेवारी महिन्यात हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला दोन वेळा कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौरव गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. त्यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. सौरव गांगुलीच्या भाजपा प्रवेशाची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे. जानेवारी महिन्यात गांगुलीची तब्येत बिघडली. त्यानंतर ही चर्चा काही काळ मागे पडली होती. आता मोदींच्या कोलकातामधील सभेनं पुन्हा एकदा गांगुलीच्या राजकीय पदार्पणाची तारीख सांगितली जात आहे. मात्र या विषयावर स्वत: सौरव गांगुली किंवा बीसीसीआयनं अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात