मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानचा नवा कट! हिंदूंची लोकसंख्या मुद्दाम कमी दाखवली? काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचा नवा कट! हिंदूंची लोकसंख्या मुद्दाम कमी दाखवली? काय आहे प्रकरण?

कराची सुप्रीम कोर्टाचे अॅटर्नी नील केशव यांनी हिंदूंच्या लोकसंख्येबाबत मोठा दावा केला आहे. हिंदूंची संख्या मुद्दाम कमी दाखवायचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे.

कराची सुप्रीम कोर्टाचे अॅटर्नी नील केशव यांनी हिंदूंच्या लोकसंख्येबाबत मोठा दावा केला आहे. हिंदूंची संख्या मुद्दाम कमी दाखवायचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे.

कराची सुप्रीम कोर्टाचे अॅटर्नी नील केशव यांनी हिंदूंच्या लोकसंख्येबाबत मोठा दावा केला आहे. हिंदूंची संख्या मुद्दाम कमी दाखवायचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे.

नवी दिल्ली, 3 सप्टेंबर: पाकिस्तानात हिंदूंवर आणि इतर अल्पसंख्याक जनतेवर (Pakistan Minorities problems) होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या वारंवार दिसून येतात. असाच आणखी एक प्रकार आता समोर आला आहे. देशाच्या जनगणनेत धार्मिक अल्पसंख्याक (pakistan hindu population) नागरिकांची संख्या मुद्दाम कमी दाखवण्यात (Pakistan Census fraud) आल्याचा आरोप केला जात आहे. या वर्गातल्या नागरिकांचं राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यासाठी ही खेळी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

यापूर्वी 2017 मध्ये पाकिस्तानात जनगणना (Pakistan Census 2017) करण्यात आली होती. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Shareef) यांच्या कार्यकाळातली ही सहावी जनगणना होती. या वर्षी मे महिन्यामध्ये हा डेटा (Pakistan Census Data) उघड झाला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 20 कोटींहून (Pakistan Population) अधिक झाली आहे. 1998मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या 13 कोटी (Pakistan 1998 census) होती. म्हणजेच, वीस वर्षांमध्ये पाकिस्तानच्या लोकसंख्येत सुमारे 7.5 कोटींची वाढ दिसून आली.

काश्मीरच्या मुस्लिमांसाठी आवाज उठवू, तालिबानचा 24 तासांत यू-टर्न

 याच अहवालात असंही दिलं होतं, की देशातली मुस्लिम लोकसंख्या वाढून 96.47 टक्क्यांवर (Pakistan Muslim population) पोहोचली आहे. म्हणजेच, इतर धर्मांतल्या नागरिकांची एकूण संख्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अगदीच कमी आहे. 2017च्या या जनगणनेतल्या माहितीनुसार, पाकिस्तानात हिंदूंची संख्या केवळ 1.73 टक्के (Pakistan Hindu Population) आहे. ख्रिश्चन नागरिकांची संख्या (Pakistan Christion population) 1.27 टक्के. जैन धर्मीयांची संख्या तर देशात 0.1 टक्क्यांहून कमी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ही आकडेवारी समोर येताच यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कराची सुप्रीम कोर्टाचे अॅटर्नी नील केशव यांनी हिंदूंच्या लोकसंख्येबाबत मोठा दावा केला आहे. पाकिस्तानातल्या हिंदूंची संख्या (Pakistan Hindu real population) या अहवालापेक्षा किती तरी जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1998च्या जनगणनेनुसार पाकिस्तानात 20 लाख हिंदू होते. 2017 च्या जनगणनेनुसार देशात 35 लाख हिंदू आहेत. मग 20 वर्षांमध्ये हिंदूंची संख्या केवळ 15 लाखांनी वाढली का, असा प्रश्नही नील यांनी या वेळी उपस्थित केला.

दुसरीकडे सेंटर फॉर सोशल जस्टिस या संस्थेचे संचालक पीटर जेकब यांनीही ख्रिश्चन नागरिकांची संख्या चुकीची दाखवली असल्याचं म्हटलं आहे. “कित्येक ख्रिश्चन नागरिक देश सोडून गेले किंवा कित्येकांनी धर्मपरिवर्तन केलं हे खरं आहे; मात्र तरीही चर्चेमध्ये असणाऱ्या रेकॉर्डनुसार, देशाच्या जनगणनेत सुमारे 5 लाख (Pakistan Christion real population) ख्रिश्चन कमी दाखवले गेले असावेत,” असं पीटर 'पाकिस्तान टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. “जनगणनेचा खरा अहवाल मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र पाकिस्तान सरकार याबाबत आम्हाला कसलीही मदत करत नाहीये. तसंच, या प्रकरणी ते तपासही करत नाहीयेत,” असंही जेकब म्हणाले.

तालिबानचं सरकार आलं! एकही महिला नाही; शुरा काउन्सिल करणार राज्य

पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांची (Pakistan minorities population) परिस्थिती चिंताजनक असल्याचं पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने कित्येक वेळा म्हटलं आहे. 2019 च्या एका अहवालात आयोगानं म्हटलं होतं, की सिंध आणि पंजाबसारख्या प्रांतांमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीयांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जात आहे. यातच आता अल्पसंख्यांकांचे राजकीय अधिकारही हिरावले जात असल्याचं या जनगणनेच्या घोटाळ्यामुळे उघड झालं आहे.

First published:

Tags: Hindu, Pakistan