मराठी बातम्या /बातम्या /देश /

'गोमूत्र प्यायल्यास संसर्ग बरा होतो'; साध्वी प्रज्ञा यांचा नवा अजब दावा

'गोमूत्र प्यायल्यास संसर्ग बरा होतो'; साध्वी प्रज्ञा यांचा नवा अजब दावा

भाजप खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi pradnya singh thakur) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे.

भाजप खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi pradnya singh thakur) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे.

भाजप खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi pradnya singh thakur) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

भोपाळ, 04 सप्टेंबर: भाजप खासदार (BJP MP) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi pradnya singh thakur) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे. गोमूत्र हे अँटीबायोटिक (Cow Urine is Antibiotic) असून यामुळे संसर्गजन्य आजार बरे होतात, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. संबंधित दावा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशा प्रकारचा दावा करणं ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही साध्वी यांनी वेळोवेळी अशाप्रकारचा अजब दावा केला आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलत असताना साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं की, “आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व प्रकारचे संसर्गजन्य रोग बरे होतात.” अशा प्रकारचा दावा केल्यानंतर सोशल मीडियात साध्वी प्रज्ञा यांच्यावर टीका केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा- सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार?, जो बायडेन यांची होणार पहिल्यांदा भेट

भाजप खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान देखील अनेकदा अशाप्रकारची वादग्रस्त विधानं केली आहेत. 'गोमूत्र प्यायल्यानं फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. त्यामुळे मला अद्याप कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही.' असं वक्तव्यही साध्वी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

हेही वाचा-रेल्वेत अर्धनग्नावस्थेत आमदाराचं लाजिरवाणं कृत्य; आक्षेप घेणाऱ्यांनाही शिवीगाळ

याशिवाय साध्वी प्रज्ञा यांनी ऐन कोरोना प्रादुर्भावच्या काळात कोरोना मुक्त होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला होता. कोरोना विषाणूची साथ समूळ नष्ट करण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सर्वजण एक आध्यात्मिक प्रयत्न करूयात, त्यासाठी 25 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करण्याचा सल्ला देखील साध्वी प्रज्ञा यांनी दिला होता. तेव्हाही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या अनेकांनी त्यांच्यावर टीक केली होती.

First published:

Tags: Bhopal News, Sadhvi