जाहिरात
मराठी बातम्या / देश / Facebookच्या ऑफिसमधून आयर्लंड आला कॉल, दिल्लीत पोलिसांनी वाचवला आत्महत्या करायला जाणाऱ्या तरुणाचा जीव

Facebookच्या ऑफिसमधून आयर्लंड आला कॉल, दिल्लीत पोलिसांनी वाचवला आत्महत्या करायला जाणाऱ्या तरुणाचा जीव

Facebookच्या ऑफिसमधून आयर्लंड आला कॉल, दिल्लीत पोलिसांनी वाचवला आत्महत्या करायला जाणाऱ्या तरुणाचा जीव

देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Police) पोलिसांच्या आणखी एका तत्परतेचं उदाहरण समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Police) पोलिसांच्या आणखी एका तत्परतेचं उदाहरण समोर आलं आहे. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी एक व्यक्तीचा जीव वाचवला आहे. हा व्यक्ती सिग्नेचर ब्रिजजवळ आत्महत्या करण्यासाठी जात होता. त्याचवेळी फेसबूक (Facebook Office) ऑफिसमधून पोलिसांना फोन आला. या फोनमध्ये फेसबूककडून सांगण्यात आलं की, एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर पोलिसांनी सतर्कता दाखवून त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. दिल्ली पोलिसांनी हे काम 10 सप्टेंबरला केलं. ज्या दिवशी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जातो. दिल्ली पोलीस सायबर सेलचे डीसीपी अनयेश राय यांनी सांगितलं की, सायबर सेलला अचानक आयर्लंडमधील फेसबुक ऑफिसमधून फोन आला. फेसबुकने पोलिसांना सतर्क केलं की अभिषेक (नाव बदलले आहे) दिल्लीत आत्महत्या करण्यासाठी जात आहे. त्याच्या फेसबूक प्रोफाईलवरुन अशी अॅक्टिव्हिटी समोर आली आहे. फेसबूकचा हा कॉल गांभीर्यानं घेत सायबर सेलनं फोन नंबरचे डिटेल्स आणि लोकेशन तपासलं असता सिग्नेचर ब्रिजजवळचा पत्ता आढळून आला. कोरोनाचा पुन्हा उद्रेक! पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक व्यक्ती कुटुंबियांच्या स्वाधीन लोकेशन सापडल्यानंतर तात्काळ नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट जिल्ह्यातील पोलीस दयालपूर, तिमारपूर आणि सीलामपूर या तीन पोलीस स्टेशनमधील SHO ला अलर्ट करण्यात आलं. इनपुटच्या आधारे, पोलिसांनी अभिषेकचा भाऊ राकेश (नाव बदलले) पर्यंत पोहोचले आणि त्याला तपासात समाविष्ट केलं. जेणेकरून तरुणांना लवकर ओळखता येईल. पोलिसांच्या तत्परतेनं, अभिषेकला ट्रेस केलं असता तो ब्रिजपासून फक्त 500 मीटर अंतरावर खजुरी खास या परिसरात होता.

तुमच्याकडे आहे फाटक्या किंवा खराब नोटा? जाणून घ्या बदलून घेण्याची प्रक्रिया

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अभिषेकचं वय 27 वर्षे आहे. त्याने B.Sc झाला आहे. तो एका खाजगी महाविद्यालयातून MBA चं शिक्षण घेत होता. पण त्यानं मध्येच त्याचं शिक्षण सोडलं.

तो एका रिलेशनशिपमध्ये होता आणि अलीकडेच त्याचं ब्रेक अप झालं होतं. ज्यामुळे तो अनेक दिवसांपासून त्रस्त होता. यामुळे त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलीस आणि फेसबुकमुळे त्याचा जीव वाचू शकला. त्यानंतर अभिषेकचं कॉन्सिलिंग करण्यात आले आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात