नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: केंद्रातल्या सत्तेपासून सलग दहा वर्षं दूर असलेल्या काँग्रेसनं (Congress) राज्यातल्या विधानसभा (State Elections) निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Polls) कॉंग्रेसनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्याकडे या मोहिमेची सूत्रं देण्यात आली आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेश हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इथं आपला चांगलाच विस्तार केला आहे. भाजपला शह देण्यासाठी उत्तर प्रदेशातली सत्ता हस्तगत करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष उत्तर प्रदेशवर एकवटलं आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपल्या रणनीतीचा भाग म्हणून प्रियांका गांधी-वड्रा यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी प्रतिज्ञा यात्रेची (Pratigya Yatra) घोषणा केली आहे.
शुक्रवारी (10 सप्टेंबर) पक्षाने जाहीर केलेल्या या मोहिमेनुसार, प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातल्या सर्व 403 विधानसभा मतदारसंघांची 12 हजार किलोमीटरची यात्रा करणार आहेत. या यात्रेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
संकट दारावर! 'ते' 25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर, जारी केला अलर्ट
या यात्रेद्वारे मतदारांना कॉंग्रेस आपली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देण्यात येणार आहे. सध्याच्या भाजप सरकारने मागील निवडणुकीवेळी भ्रष्टाचार, महागाई, महिलांबाबतचे गुन्हे, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था अशा विविध बाबतींत दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यात येणार आहे.
या बैठकीत प्रियांका गांधी यांनी उमेदवारांची निवड प्रक्रिया (Candidate selection), मतदान व्यवस्थापन (Voting Management) आणि विविध क्षेत्रांमध्ये राबवल्या जाणाऱ्या मोहिमांवर चर्चा केली. राज्यातल्या पक्षाच्या नेत्यांकडून त्यांनी सूचनाही मागवल्या आहेत. या यात्रेदरम्यान राज्याच्या विधानसभा मतदारसंघांतली सर्व मोठी गावं आणि शहरांना भेटी देण्याचा पक्षाचा मानस आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि राज्य सल्लागार आणि रणनीती समितीचे सदस्य या यात्रेच्या मार्गाला अंतिम स्वरूप देणार आहेत.
दरम्यान, या बैठकीपूर्वी प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत (Govind Vallabh Pant) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसंच 1965मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद (Abdul Hamid) यांनाही आदरांजली अर्पण केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.