मराठी बातम्या /बातम्या /विदेश /डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता अमेरिकेचा मोठा निर्णय, लोकांना घ्यावा लागणार कोरोना लसीचा बूस्टर शॉट

डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता अमेरिकेचा मोठा निर्णय, लोकांना घ्यावा लागणार कोरोना लसीचा बूस्टर शॉट

Covid 19 Delta Variant: डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढतोय. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं (America) मोठा निर्णय घेतला आहे.

वॉश्गिंटन, 19 ऑगस्ट: Covid 19 Delta Variant: कोरोना व्हायरसनं (Corona Virus) जगभरात थैमान घातलं आहे. त्यातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचाही (Delta Variant) धोका वाढत चालला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढतोय. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं (America) मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता अमेरिकेनं लसीकरणाबाबत (Vaccination) मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत आता लोकांना कोरोना लसीकरणाचे बूस्टर शॉट्स (Booster shots) देण्यात येतील. कोविड -19 लसीकरणाची प्रभावीता कालांतराने कमी होत आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी असा इशारा दिला की, त्यांनी 20 सप्टेंबरपासून सर्व अमेरिकन लोकांसाठी बूस्टर शॉट्स अधिकृत केले आहेत. लसीचा बूस्ट शॉट व्यक्तीचं पूर्णपणे लसीकरण झाल्यानंतर आठ महिन्यांनी लागू होतो.

''मी पैसे घेऊन पळालो नाही'',  अशरफ गनी यांचं आरोपांवर स्पष्टीकरण

देशातील उच्च आरोग्य अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, उपलब्ध डेटावरून हे स्पष्ट आहे की लसीकरणाच्या सुरुवातीच्या डोसनंतर (कोरोनाव्हायरस) संसर्गापासून संरक्षण कालांतराने कमी होते. त्याच वेळी, डेल्टा प्रकाराच्या वाढत्या संसर्गामध्ये सौम्य आणि मध्यम रोगापासून संरक्षण कमी झाल्याचे पुरावे आम्ही पाहत आहोत.

पुढे त्यांनी म्हटलं की, आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की कोरोना विरुद्ध लसीपासून संरक्षण वाढवण्यासाठी आणि त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी बूस्टर शॉटची आवश्यकता असेल.

First published:

Tags: America, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus