काबूल, 19 ऑगस्ट: दोन दिवसांपूर्वी काबूल विमानतळावरील (Kabul Airport) एक धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला होता. देश सोडण्यासाठी नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली होती. याचवेळी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानात जागा न मिळाल्यानं तीन तरुणांनी विमानाचे टायर पकडले आणि लटकले होते. मात्र ते तिघंही खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. आता विमानातून खाली पडणाऱ्या एका मुलाच्या कुटुंबाची माहिती समोर आली आहे. मृत तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतरचा एक भयानक क्षण सांगितला आहे.
काबूल विमानतळावरुन USAF's च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केलं. अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी, या देशातून कसंही बाहेर पडण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसले. हे तरुण इंजिनवर बसूनच लँडिंग गिअर पकडून होते. काबूलमधून कसंही बाहेर पडण्यासाठी त्यांची ही धडपड होती. परंतु विमानाने उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडलेले अफगाणी लोक हवेतून खाली पडले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता.
Shocking scene from #Kabul Airport. Several Afghans who had grabbed landing gear of a #USAF's C-17A transport aircraft to flee from #Afghanistan dropped from the air as the airplane took off! pic.twitter.com/m0LNTEhmA7
— An investor's diary (@Aninvestordiary) August 16, 2021
यातच 17 वर्षीय तरुण खाली पडतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या मृत तरुणाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, त्याचे पाय आणि हात गायब झाले होते. मी स्वतः त्याचा मृतदेह परत आणला. सोमवारी C-17A विमानातून लोकांना पडलेले पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे अवशेष शोधून काढले आणि काबूलच्या मुख्य विमानतळावरुन हटवले.
द सनच्या रिपोर्टनुसार, 17 वर्षीय मृत तरुणाच्या नातेवाईकानं सांगितलं की, ज्यावेळी त्याच्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा समजलं की काहीतरी गडबड आहे. कारण त्याचा फोन एका अनोळखी व्यक्तीनं उचलला होता. त्यानंतर चितेंत असलेल्या कुटुंबियांनी 17 वर्षीय मृत तरुण आणि त्याचा 16 वर्षीय त्याच्या भावाला शोधण्यासाठी विमानतळावर पोहोचले.
Afghanistan’s tragedy right now in Kabul international airport: Afghan youth on the engine of American plane to leave the country. pic.twitter.com/CoTS8sq9c3
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021
कुटुंबाने सांगितले की, दोन्ही भाऊ तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी इतके हतबल झाले होते की, दोघेही सुरक्षितपणे दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.
हेही वाचा- 'या' देशात आता लोकांना घ्यावा लागणार Vaccineचा बूस्टर शॉट
भावाचा मृतदेह अद्याप गायब
मृत तरुणाच्या 16 वर्षीय भावाचा मृतदेह अद्याप सापडला नाही आहे. आम्ही अस्वस्थ आहोत, कारण आमच्या कुटुंबियातले दोन सदस्य गमावले आहेत. आम्हाला दोघांपैकी एकाचा मृतदेह मिळाला आहे. मात्र दुसऱ्याचा अजूनही बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन चौकशी केली. जेणेकरून तो मृत किंवा जिवंत सापडेल. मात्र, आम्हाला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Kabul, Taliban