गाझियाबाद : बऱ्याचदा रस्त्यावर लिहिलेलं असतं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक याशिवाय वेगावर नियंत्रण ठेवाल तर आपलं आयुष्य वाचेल पण बऱ्याचदा या फलकांकडे दुर्लक्ष केलं जातं. याचे परिणाम नंतर भोगावे लागतात, वेगामुळे एका कुटुंबाला मृत्यूनं गाठलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कारचा वेग इतका भयंकर होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर मंगळवारी मोठा अपघात झाला. एक्सप्रेस वेवर बस आणि कारची धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी गंभीर जखमी झालेल्या 8 वर्षीय चिमुकल्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Nagpur News : देवदर्शन करुन घरी येताना दोघांना मृत्यूनं गाठलं, 7 जखमी; अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOVIDEO | Five people were killed after a SUV collided with a bus on Delhi-Meerut Expressway in Ghaziabad. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) July 11, 2023
(Warning: Disturbing visuals)
(Source: Third Party) pic.twitter.com/USXK2kej3f
धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्ण चुराडा झाला आहे. अपघातानंतर मृतदेह अडकले होते ते कटरने कापून काढण्याची वेळ आली आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. 8 वर्षांचा मुलगा वाचला आहे.