Home /News /national /

धक्कादायक! सुशांतच्या आत्महत्येनंतर 6 तरुणांनी संपवलं आयुष्य

धक्कादायक! सुशांतच्या आत्महत्येनंतर 6 तरुणांनी संपवलं आयुष्य

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी वाचून नैराश्य आल्यामुळे देशभरात 6 तरुणांनी सुशांतसारखंच आयुष्य संपवलं आहे. त्यातले 5 अल्पवयीन आहेत.

    मुंबई, 20 जून  : चित्रपट तारे-तारका, त्यांचं वैयक्तिक विषय अनेक सामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पौगंडावस्थेतल्या मुलांवर तर या सेलेब्रिटींचा प्रभाव मोठा असतो आणि तो कधी कधी टोकाचं पाऊल उचलण्यास कारणीभूत ठरतो, हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर धक्कादायकरीत्या समोर आलं आहे. देशभरात विविध घटनांमध्ये अल्पवयीन मुलांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर स्वतःचं आयुष्यही संपवल्याच्या बातम्या विविध वृत्तांमध्ये आल्या आहेत. 1. पाटण्याच्या एका 17 वर्षांच्या मुलीला सुशांतची बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला. तिला दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने अगोदरपासूनच ती नैराश्यग्रस्त होती. त्यात सुशांतची बातमी ऐकली तेव्हापासून ती फक्त त्याच्याचबद्दलच्या बातम्या पाहात आणि वाचत होती. आईने तिला असं करू नको म्हणून समजावलंसुद्धा. पण तिने आईच्या साडीपासून केलेल्या फासाला लटकून आत्महत्या केली. 2. विषाखापट्टणमच्या एक 21 वर्षीय तरुणी सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यापासून बेचैन होती. ती एका खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करते. पण सुशांत गेल्याची बातमी ऐकल्यानंतर ती नैराश्यात गेली. ती वारंवार त्याच्या VIDEO क्लिप्स बघत होती. अखेर दोन दिवसांपूर्वी तिने सीलिंगला ओढणी बांधून गळफास घेतला. 3. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात लोदिपूर गावातल्या एका 10 वर्षांच्या मुलाने सुशांतची बातमी ऐकल्यानंतर स्वतःला फास लावून घेतला. या मुलाने आदल्या रात्रीच सुशांतचा M S Dhoni An Untold Story चित्रपट पाहिला होता. असा फास घेऊन कसा कुणाचा जीव जाऊ शकतो, असं त्याने सुशांतची बातमी पाहून आई-वडिलांना विचारलही होतं. 4. अंदमानमध्ये एका किशोरवयीन मुलीने सुशांतबद्दलच्या बातम्या वाचून स्वतःला संपवायचा निर्णय घेतला. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या पाहून तिला नैराश्य आलं. त्यानंतर अंदमान निकोबारच्या पोलीस महासंचालकांनी तिथल्या तरुणांना टोकाचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करणारं आवाहनही केलं होतं. 5. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दोनच दिवसात आसाममधून एक बातमी आहे. त्याच्या पोस्टरसमोर उभी Miss You sir, अशी पोस्ट लिहित TikTok VIDEO बनवणाऱ्या एका तरुण मुलीने खरोखरच रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. श्रमिक एक्स्प्रेसमोर जीव देणाऱ्या या तरुण मुलीने आत्महत्या करण्यापूर्वीसुद्घा एक TikTok Video शेअर केला होता. 6. उत्तर प्रदेशात बरेलीतून अशीच एक धक्कादायक बातमी आली होती. सुशांतचा एक दहावीत शिकणारा फॅन त्याच्या आत्महत्येच्या बातमीने प्रचंड नैराश्यात गेला. तो करू शकतो तर मी का नाही, असं लिहून ठेवत त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. संकलन - अरुंधती भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे चीन, या 'Email Id' पासून सावधान जिद्दीला सॅल्युट! शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा प्रत्यक्ष आयुष्यात कसा होता सुशांत सिंह राजपूत? त्याचे कधीही न पाहिलेले VIDEO
    First published:

    Tags: Sushant Singh Rajpoot

    पुढील बातम्या