मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सॅल्युट तिच्या जिद्दीला! शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा

सॅल्युट तिच्या जिद्दीला! शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंद्रायणी यांनी आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंद्रायणी यांनी आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंद्रायणी यांनी आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

  बुलडाणा, 20 जून: शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि वेगळं काही तरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या इंद्रायणी गोमासे यांना मोठं यश संपादन केलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंद्रायणी यांनी आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

  हेही वाचा...एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत झळकला दुसऱ्या क्रमांकावर

  शिकून काय करायचं, घरचं तर सांभाळावं लागतं, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण आहे. पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षण पूर्ण करून यशाचं शिखर गाठलं आहे. वडिलांकडे फक्त तीन एकर जमीन. त्यात तीन बहिणी आणि एका भावाच्या शिक्षणाचं ओझं, मात्र इंद्रायणी यांच्या वडिलांनी मुलींचं शिक्षण थांबवलं नाही. शेती पिकवून त्यांनी मुलींचं शिक्षण व लग्न केले.

  इंद्रायणी यांच्या लग्नानंतर पती सीआरपीएफमध्ये दाखल झाले. ते सध्या छतीसगड येथील बस्तर येथे देशाची सेवा करत आहेत. बाकी परिवार शेतकरी असल्यावरही, सासरच्यांनी त्यांचा शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं. याच फलित म्हणजे इंद्रायणी यांनी कृषी पदविकेत 10 पुरस्कार पटकावले. यात 5 सूवर्ण, 2 रजत तर 3 रोख पुरस्कार आहेत.

  कृषी पदवी मिळवून शासकीय कार्यलयात नोकरी मिळवली. तर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचू शकतील, नाही तर शेतीवर अनेक संशोधन केली जातात. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या करता एवढ्यावरच न थांबता इंद्रायणी यांनी स्पर्धा परीक्षेचा पुणे येथून खासगी शिकवण्यातून स्वतः अभ्यास करून राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण होऊन ओबीसी या प्रवर्गातून मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावून आता त्या तहसीलदार झाल्या आहेत.

  हेही वाचा...गलवानमध्ये हिंसक संघर्ष! चीनच्या फसवणुकीनंतर भारतानं तयार केला 'प्लॅन बी'

  इंद्रायणी यांनी या यशाचं श्रेय त्यांनी त्यांचे आईवडील, पती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलं आहे. इच्छाशक्ती व परिश्रम करण्याची जिद्द असली की सर्व शक्य आहे, हे इंद्रायणी यांनी दाखवून दिलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Buldana, MPSC, Mpsc exam, Mpsc exam result, Mpsc website, Vidarbha